सावरकर संमेलनाचे सांगलीत शुक्रवारी उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर यांच्या हस्ते होणार आहे.

सांगली - तिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन शुक्रवार (ता. 20) पासून विश्रामबागमधील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला प्रांगणात होणार आहे. त्याचे उद्‌घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष, आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

ते म्हणाले, "तीन दिवस चालणाऱ्या संमेलनास राज्यभरातून सावरकरप्रेमी येतील. त्यासाठी प्रशालेच्या प्रांगणात गतीने तयारी सुरू आहे. या परिसराला धोंडूमामा साठेनगर असे नाव देण्यात आले आहे. दीड हजाराहून अधिक लोक बसू शकतील, अशी व्यवस्था आहे. परिसरात पार्किंग सोय असेल. सावरकरांचे साहित्य, चित्रप्रदर्शन होणार आहे. सांगली, मिरजेतील संयोजन समितीचे सर्व सदस्य पूर्णवेळ देऊन तयारी करत आहेत.'' खासदार संजय पाटील स्वागताध्यक्ष आहेत. नियोजन समिती सदस्य मकरंद देशपांडे, बाळासाहेब देशपांडे, अशोक तुळपुळे, नितीन शिंदे उपस्थित होते.

वेळापत्रक -

शुक्रवार - 20 एप्रिल 2018 
* ग्रंथदिंडी
वेळ - सायंकाळी 4, स्थळ - गावभाग सांगली, विश्रामबाग आणि मिरज 
* व्याख्यान  
सायंकाळी 6.30 वा. 
1) मी येसू (वहिनी) बोलतेय - सादरकर्त्या सौ. प्रेरणा लांबे, स्थळ - सिटी हायस्कूल 
2) सहा सोनेरी पानांचा इतिहास - वक्ते गीता उपासणी, स्थळ - सावरकर प्रतिष्ठान प्रांगण 
3) आज सावरकर असते तर.. - वक्ते शंतनू रिठे, स्थळ - ज्युबिली कन्याशाळा (मिरज) 

शनिवार - 21 एप्रिल 2018 
* सकाळी 9 वा. - उद्‌घाटन हस्ते - केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, अध्यक्ष - खासदार शरद बनसोडे, उपस्थिती - रघुनाथ कुलकर्णी, संमेलनाध्यक्ष डॉ. दा. वि. नेने तथा दादूमियॉ. 
* सकाळी 11.15 वा - व्याख्यान वक्ते - अॅड. किशोर जावळे, विषय - सावरकरांचा विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववाद 
* दुपारी 12.15 वा. - परिसंवाद 'सावरकरांच्या कल्पनेतून बलशाली भारत व सद्य:स्थिती', वक्ते - दत्तात्रय शेकटकर, शशिकांत पित्रे, जयवंत कोंडविलकर. 
* दुपारी 2 वा. - व्याख्यान वक्ते - हेमंत बर्वे, विषय - जयोस्तुते... 
* दुपारी 4 वा. - परिसंवाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा. सावरकरांच्या दृष्टीतील जाती पल्याडला भारत. वक्ते - खासदार अमर साबळे, रवींद्र गोयल, भाऊ तोरसेकर, यमाजी मालकर. 
* सायंकाळी 7 वा. - सांस्कृतिक कार्यक्रम - उत्सव तेजाचा. 

रविवारी - 22 एप्रिल 2018 
* सकाळी 9 वा. - व्याख्यान वक्‍ते - भागवताचार्य वा. ना. उत्पात, विषय - सावरकरांचे क्रांतीकारी साहित्य. 
* सकाळी 10.45 वा. - मुलाखत - शेषराव मोरे. 
* दुपारी 1.30 वा. - परिसंवाद - देश उभारणीसाठी शिक्षण व त्यातील सावरकरांची भूमिका, वक्ते - मंत्री गिरीश बापट, डॉ. निलिमा सप्रे, प्रा. राजेंद्र ठाकूर, प्रा. प्रशांत देशपांडे. 
* दुपारी 3 वा. - व्याख्यान वक्ते - प्रा. सचिन कानिटकर, विषय - माझे सावरकर. 
* सायंकाळी 5 वा. - समारोप उपस्थिती - शिक्षणंत्री विनोद तावडे. मुख्य वक्ते - प्रदीप रावत, विषय - सावरकरांचा बुद्धिवाद आणि विज्ञाननिष्ठा

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The inauguration of the Savarkar Sammelan on Friday