साताऱ्यात दोन व्यावसायिकांवर 'आयकर'चे छापे

Income Tax department raid on two businessmen in Satara
Income Tax department raid on two businessmen in Satara

सातारा : आयकर विभागाने येथील अमीन ट्रेडर्स आणि दीप्ती ट्रेडर्स या दोन 
नामांकित व्यावसायिकांवर छापा टाकला. तपासणीअंती अमिनने दोन कोटी ५० लाख तर दिप्तीने दोन कोटी २५ लाख इतके उत्पन्न लपविल्याचे शपथपूर्वक मान्य केले.

त्यावरील कर व दंड भरण्याचे मान्य केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (सातारा रेंज) करुण कांत ओझा यांनी दिली. ओझा म्हणाले, ''प्रधान मुख्य आयकर आयुक्त अंशु जैन आणि प्रधान मुख्य आयुक्त रवींद्र पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत अमीन ट्रेडर्सच्या चार ठिकाणी तर दीप्ती ट्रेडर्सच्या एका ठिकाणी तपासणी करण्यात आली. खतावणीमध्ये तफावत,खरेदी-विक्री आणि मालाचा साठा यामधील तफावत आदी गोष्टी आढळल्या.''

ही कारवाई आयकर विभागाचे उपायुक्त रत्नाकर शेळके यांच्यासह एकूण ४० अधिकारी आणि कर्मचारी समवेत केल्याचे ओझा यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com