बेळगाव, गोकाकला "प्राप्तीकर'चा छापा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

बेळगाव - बेळगावचे पालकमंत्री व राज्याचे लघुउद्योग मंत्री रमेश जारकीहोळी, त्यांचे लहान भाऊ लखन जारकीहोळी, राज्य महिला प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर गुरुवारी (ता. 19) एकाचवेळी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. बेळगावातील कुवेंपूनगरमध्ये श्रीमती हेब्बाळकर यांच्या घरावर, तर जारकीहोळी बंधूंवर गोकाकमध्ये छापा टाकण्यात आला. पालकमंत्री जारकीहोळी यांच्या जवळच्या नातेवाईकांचीही प्राप्तीकर विभागाने चौकशी केली. 

लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कुवेंपूनगरमधील बंगल्याजवळ गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक सहा वाहने दाखल झाली. प्राप्तीकर विभागाचे सुमारे आठ अधिकारी, काही पोलीस तसेच महिला कॉन्स्टेबल घरात शिरले. पुढील व पाठीमागील सर्व दरवाजे बंद करून त्यांनी तपासाला सुरवात केली. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर घरी नव्हत्या, काही कामासाठी बंगळूरला गेल्याची माहिती मिळाली. परंतु, प्राप्तीकरच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. या काळात त्यांच्या दोघी बहिणींनाही बोलावून घेत त्यांच्याकडून काही माहिती घेतली. त्यांच्याशिवाय आत कोणालाही प्रवेश दिला नाही, शिवाय कोणाला बाहेरही जाऊ दिले नाही. प्राप्तीकरासंबंधीची कागदपत्रे, संपत्तीचे विवरण याबाबतची कागदपत्रे त्यांच्याकडून तपासण्यात आली. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. 

पालकमंत्र्यांवर गोकाकला छापा 
पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा बंगला गोकाकमध्येही आहे. शिवाय त्यांचे धाकटे बंधू लखन जारकीहोळी देखील तेथेच राहतात. या दोघांच्या घरावरही सकाळी आठच्या सुमारास छापा पडला. याशिवाय त्यांच्याशी संलग्न असलेले आणखी आणखी काहीजण, तसेच चिक्कोडी तालुक्‍यातील निपाणीजवळील त्यांचे नातेवाईक यांच्यावरही छापा टाकला आहे. पालकमंत्र्यांसह श्रीमती हेब्बाळकर या कॉंग्रेसच्या दोन मातब्बर नेत्यांवर छापा पडल्याने संपूर्ण जिल्ह्यात याची दिवसभर चर्चा सुरू होती.

Web Title: Income tax raid on Belgaum, Gokak