सांगली जिल्हा बॅंकेवर प्राप्तिकरचा छापा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

सांगली - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पुष्पराज चौकातील मुख्य इमारतीवर आज दुपारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली. नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील नोंदी तपासल्या. त्यासाठी दुपारी पावणेदोनपासून सायंकाळी उशिरापर्यंत हे पथक तळ ठोकून होते. त्यामुळे नाकाबंदीसारखी स्थिती होती. 

प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दुपारी दीड वाजता बॅंकेत दाखल झाले. लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर पोहचले आणि पुढील पाच मिनिटांत त्यांनी मजल्याचा ताबा घेतला. अन्य अधिकाऱ्यांनी विविध विभागांचा ताबा घेऊन कागदपत्रांची, संगणकावरील नोंदींची तपासणी सुरू केली. काही महत्त्वाच्या नोंदी प्राप्तिकर विभागाने ताब्यात घेतल्याचे समजते. 

केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर पुढील चार दिवसांत जिल्हा बॅंकेत 317 कोटींच्या पाचशे, हजाराच्या नोटा जमा झाल्या. त्यानंतर नोटा जमा करून घेण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर ओघ थांबला. रिझर्व्ह बॅंकेच्या धोरणाविरुद्ध राज्यभर या बॅंकांनी आवाज उठवला, सांगलीत मोर्चा काढला. त्यानंतरही धोरणात बदल झाला नाही, शिवाय बॅंकेमागे चौकशीचा ससेमिरा लागला. पाचशे, हजार रुपयांच्या नोटांच्या रूपाने जमा झालेल्या रकमा नेमक्‍या कुणाच्या याची चौकशी गतीने सुरू झाली. नाबार्डने प्रथम सहा शाखा आणि नंतर सात शाखांची तपासणी केली. त्यात काही आढळले नाही, असे बॅंकेने जाहीर केले. परंतु, 317 कोटी आले कुठून, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्राप्तिकरचा प्रयत्न सुरूच राहिला. 

Web Title: income Tax raid on the district of Sangli Bank