खटावला बसच्या फेऱ्या वाढविण्याची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मागणी

Demand for bus in khatav
Demand for bus in khatav

खटाव ः येथील शहाजीराजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी साडेअकरानंतर स्थानिक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी केली आहे. सकाळच्या प्रहारात कॉलेज असल्याने तिन्हीही शाखेची मुले साडेअकरानंतर बस स्टॅण्डवर बसची वाट पाहात बसलेली असतात. मात्र, नेमकी याच वेळेत बसच्या फेऱ्या खूपच नगण्य असल्याने बहुतांशी मुलांना त्यातही मुलींना ताटकळत बसावे लागत आहे. संबंधित आगारप्रमुखांनी दखल घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
 
शहाजीराजे महाविद्यालयात आर्ट, कॉमर्स व सायन्सच्या तिन्हीही शाखा कार्यरत आहेत. त्यामुळे कॉलेजमध्ये केवळ खटाव तालुक्‍यातीलच नव्हे, तर आसपासच्या तालुक्‍यातील मुले-मुली याच कॉलेजला पहिला अग्रक्रम देतात. स्वाभाविकच जवळपास दोन हजार विद्यार्थी खटाव व आसपासच्या गावांमधून कॉलेजला शिक्षणासाठी येतात. पैकी बाराशे ते तेराशे मुले-मुली परगावहून येतात.
 
आर्ट, कॉमर्स कॉलेज सकाळी साडेअकराच्यादरम्यान सुटते. तथापि खटावमधून बसच्या फेऱ्या कमी असल्याने व एकाच वेळी एवढी मुलं बस स्टॅंडवर बसची वाट पाहात बसलेली असतात. या वेळेत ज्या काही बस उपलब्ध आहेत. त्यामध्ये जागा मिळवण्यासाठी मुलांची चढाओढ होत असते. स्वाभाविकच मुलींना तासन्‌तास वाट पाहात बसावे लागते. त्यात बस स्थानकही लहान असल्याने बहुतांशी मुली बस स्थानकाच्या बाहेर उन्हातान्हात, धुळीचा मार सोसत बसची वाट पाहात बसलेल्या असतात. याचा गैरफायदा येथील सडकसख्याहरी घेत असतात. मुलींची छेड काढणे, नाहक त्रास देणे, फूस लावणे आदी गैरप्रकारांना मुलींना दररोज तोंड द्यावे लागते.

त्यामुळे काही मुली पास असूनही अशा प्रसंगांना तोंड देण्यापेक्षा खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. साहजिकच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या मार्गावरील बसची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाकडून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com