‘पंचगंगा‘ पाणी पातळीत झपाट्याने वाढ, आपत्कालीन यंत्रणा सज्ज

पंडित कोंडेकर
शनिवार, 7 जुलै 2018

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरात जरी गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी गेल्या २४ तासात पाच फुटाने वाढली आहे. जून्या पूलालगत पाणी आले असून पालिकेने आपत्तकालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे., शहरात गेली दोन दिवस पावसाने मोठी  उघडीप दिली आहे. मात्र  जिल्ह्याच्या पश्चीम  भागातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे  येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी गेल्या कांही तासापासून झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता पाण्याची पातळी ५१ फूट  ३ इंच होती.

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरात जरी गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी गेल्या २४ तासात पाच फुटाने वाढली आहे. जून्या पूलालगत पाणी आले असून पालिकेने आपत्तकालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे., शहरात गेली दोन दिवस पावसाने मोठी  उघडीप दिली आहे. मात्र  जिल्ह्याच्या पश्चीम  भागातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे  येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी गेल्या कांही तासापासून झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता पाण्याची पातळी ५१ फूट  ३ इंच होती. आज सकाळी १० वाजता ५६ फुटावर पाण्याची पातळी पोहचली आहे. 

दरम्यान, नदीपात्रातील पाणी पाहण्यासाठी सांयकाळी नागरिकांची नव्या व जून्या पूलावर पाणी येत आहे. या ठिकाणी खाद्य पदार्थांच्या गाड्यांची रेलचेल असून तेथे गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. 

जलपर्णी प्रवाहाबरोबर...
पंचगंगा नदीपात्रात मोठया प्रमाणात जलपर्णी वाढली होती. पण पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जलपर्णी प्रवाहासोबत वाहत जात आहे. जून्या पूलालगत ही जलपर्णी  मोठया प्रमाणात आज साचून राहिली होती.

Web Title: increase in level of panchaganga river