आल्याच्या दरात भरघोस वाढ 

आल्याच्या दरात भरघोस वाढ 

काशीळ - आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या जुन्या आल्याच्या प्रतिगाडीस सात ते आठ हजार रुपयांनी वाढ होऊन 30 ते 31 हजार रुपये, तर नवीन आल्याच्या प्रतिगाडीस 23 ते 25 हजार दर मिळत आहे. दरातील सुधारणेमुळे आले उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यातील आले सातारी आले म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात आल्याची सर्वाधिक कोरेगाव, सातारा, कऱ्हाड, खटाव तालुक्‍यांत लागवड होते. 25 ते 30 हजार रुपयांवरून मागील जून, जुलै महिन्यात आल्याचे दर 15 ते 16 हजार रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी अडचणीत आले होते. ऑगस्ट महिन्यात आल्याच्या दरात अल्प प्रमाणात का होईना वाढ होण्यास सुरवात झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात तीन ते चार हजार रुपयांनी वाढ होऊन प्रतिगाडीस 19 ते 20 हजार रुपये गेले होते. ऑक्‍टोबर महिन्यांच्या सुरवातीपासून पुन्हा आल्याच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. सध्या प्रतिगाडीमागे सात ते आठ हजार वाढ होऊन सध्या प्रतिगाडीस 30 ते 31 दर मिळत आहे, तसेच नवीन लागवड (जूनमध्ये) झालेल्या आल्यास प्रतिगाडीस 23 ते 25 हजार रुपये दर मिळत आहे. दरातील वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. 

किडींचा प्रादुर्भाव  
जिल्ह्यात मे महिन्यात करण्यात आलेल्या नवीन आले लागवडीस वातावरणातील बदलामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. सध्या आले पिकावर कंदकुज, कंदमाशी, हुमणी, खोडकीड, पाने कुडतरणारी अळी, करपा या किडी दिसून येत आहेत. उष्णतेत वाढ झाल्याने किडी नियंत्रणात येत नसल्याने व दर चांगले असल्याने आले काढणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सध्या नवीन आल्यास प्रतिगाडीस 23 ते 25 हजार रुपये दर मिळत आहे. थंडीत वाढ झाल्यास किडी नियंत्रणात येतील, असे शेतकरी सांगत आहे. 

""वातावरणात बदलामुळे किडी नियंत्रणात येत नाही व सध्या दरात वाढ झाल्याने नवीन आल्याचे काढणी केली जात आहे. थंडीत वाढ झाल्यास आल्यावरील किड नियंत्रणास येण्यास मदत होणार आहे.'' 
- संजय गोरे, प्रगतशील शेतकरी, पाल, ता. कऱ्हाड 

""माझ्या 15 गुंठे क्षेत्रातील आल्यास किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने काढणी केली. या क्षेत्रात नऊ गाड्याचे उत्पादन मिळाले असून, प्रतिगाडीस सरासरी 25 हजार रुपये दर मिळाला आहे.'' 
- संजय माने, प्रगतशील शेतकरी, काशीळ, ता. सातारा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com