कोतवालांच्या मानधनात वाढ !

Increased kotwals income in maharashtra
Increased kotwals income in maharashtra

सोलापूर : राज्यातील कोतवालांच्या मानधनात दरमहा अडीच हजार रुपये वाढ केल्याचा आदेश महसूल व वनविभागाने आज (बुधवारी, ता. 6) जारी केला. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कोतवालांना दरमहा 15 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2019 पासून होणार आहे.

राज्यातील कोतवाल आणि मानधनावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली होती. या समितीने शासनास सादर केलेल्या शिफारसी, कोतवालांच्या एकत्रित कामांचे स्वरूप, त्यांची शासकीय कामांशी पूर्णवेळ बांधिलकी लक्षात घेता ज्येष्ठतेनुसार त्यांच्या मानधनात वाढ करणे, राज्य शासकीय सामुहिक विमा योजना लागू करणे, अटल निवृत्ती योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देणे यासंदर्भात विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आला.

शासनाच्या निर्णयानुसार, महसूल विभागांतर्गत 'ड' वर्गातील प्रथम नियुक्तीच्या पदापैकी 40 टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. जे कोतवाल ड वर्गाच्या पदोन्नतीस पात्र ठरतील. त्यांना दरमहा 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. राज्य शासकीय सामुहिक विमा योजना लागू करणे, अटल निवृत्ती योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ ज्या-त्या योजनांतील अटीनुसार देण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

 

सध्याचे मानधन सेवाकालावधी केलेली वाढ सेवाज्येष्ठतेनुसार वाढ सेवाज्येष्ठतेनुसार मानधन
5 हजार रुपये 10  वर्षे   2500 रुपये शून टक्के 7500 रुपये
5 हजार रुपये 11 ते 20 वर्षे   2500 रुपये तीन टक्के 7725 रुपये
5 हजार रुपये   21 ते 30 वर्षे 2500 रुपये   चार टक्के   7800 रुपये
5 हजार रुपये 31 वर्षावरील  2500 रुपये  पाच टक्के 7875 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com