इंदापूरच्या पश्‍चिम भागाला पावसाची हुलकावणी

राजकुमार थोरात
बुधवार, 6 जून 2018

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागाला पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पश्‍चिम भागातील शेतकरी चितांग्रस्त झाले असुन, खरीपाची पेरणी खोळंबली आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागाला पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पश्‍चिम भागातील शेतकरी चितांग्रस्त झाले असुन, खरीपाची पेरणी खोळंबली आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये गेल्या वर्षी जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र चालू वर्षी जुन महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरीही पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे शेतकरी चितांग्रस्त झाले आहे. जुन महिन्याच्या पहिल्याच दिवशी पहाटेच्या वेळी आभाळ काळ्या ढगांनी भरुन आले होते. पावसाच्या हलक्या सरी कोसळ्यामुळे शेतकऱ्यांना दोन-तीन दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र पाऊस हुलकावणी देवू लागला असल्याने शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळ्यामध्ये जोपासलेली पिके पावसाअभावी जुन महिन्यामध्ये जळण्याची भिती निर्माण झाली आहे. तसेच उभी असलेली ऊसासारखी पिके ही जळण्याच्या मार्गावरती आहे. चारा पिके ही धोक्यात आली असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न ही गंभीर होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न देखील गंभीर झाला आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तालुक्यातील खरीप पिकांची पेरणी देखील खोळंबली आहे. चातक पक्षाप्रमाणे शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतिक्षेमध्ये आहे.

Web Title: indapur - farmers Waiting for monsoon