इंदापूरचे तहसीलदार कामे करण्यात तत्पर

राजकुमार थोरात
मंगळवार, 22 मे 2018

इंदापूरचे तहसीलदार हे लोकांची कामे करण्यात खुपच तत्परता दाखवत असल्याचे दिसून येते. त्यांनी एका अंध व्यक्तीचे सहा वर्षापासुन रखडेले काम तत्काळ मार्गी लावले आहे. अकोले येथील जालिंदर ज्ञानदेव दराडे (वय ६०)वर्षे हे जन्मापासुन दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. २०१२ पासुन त्यांच्याकडे रेशन कार्ड नसल्यामुळे त्यांना अनेक शासकीय मदत घेण्यास अडचण येत होती. त्यांनी अनेकवेळा रेशन कार्ड मिळावे यासाठी पाठपुरावा ही केला होता. इंदापूर तहसील कार्यालयामध्ये गावातुन जाणाऱ्या व्यक्तीला माझे नवीन रेशन कार्ड घेवून असे सांगत होते. मात्र त्यांना प्रत्येकवेळी काहीतरी कारणे सांगण्यात आली होती. 

वालचंदनगर - इंदापूरचे तहसीलदार हे लोकांची कामे करण्यात खुपच तत्परता दाखवत असल्याचे दिसून येते. त्यांनी एका अंध व्यक्तीचे सहा वर्षापासुन रखडेले काम तत्काळ मार्गी लावले आहे. अकोले येथील जालिंदर ज्ञानदेव दराडे (वय ६०)वर्षे हे जन्मापासुन दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. २०१२ पासुन त्यांच्याकडे रेशन कार्ड नसल्यामुळे त्यांना अनेक शासकीय मदत घेण्यास अडचण येत होती. त्यांनी अनेकवेळा रेशन कार्ड मिळावे यासाठी पाठपुरावा ही केला होता. इंदापूर तहसील कार्यालयामध्ये गावातुन जाणाऱ्या व्यक्तीला माझे नवीन रेशन कार्ड घेवून असे सांगत होते. मात्र त्यांना प्रत्येकवेळी काहीतरी कारणे सांगण्यात आली होती. 

अखेर, त्यांनी आज सकाळी दहा वाजता इंदापूरचे नवीन इमारतीमध्ये तहसील कार्यालय विचारत विचारत गाठले. दुपारी एकच्या सुमारास कार्यालयासमोर अंध असलेले जालिंदर दराडे थांबलेले तहसिलदार साहेबांना दिसतात. त्यावेळी तहसिलदार साहेब कार्यालयामध्ये गेले दराडे यांच्या कामाची चौकशी करुन त्यांच्या रेशनकार्डवर सही केली व त्यांचे कार्ड अन्नसुरक्षा योजनेमध्ये ही तातडीने समाविष्ठ करण्याच्या सुचना दिल्या. तसेच इतरही चौकशी केली. दराडे यांनी तहसीलदारच्या कामावरती आंनदीत होवून त्यांच्या हातामध्ये हात देवून आभार मानले.

Web Title: Indapur tahsildar works forward