इंदापूरचे निष्क्रिय लोकप्रतिनिधी पाणी, नोकरी देण्यास अपयशी

राजकुमार थोरात
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना पाणी देण्यास, युवकांना नोकरी देण्यास अपयशी ठरले आहेत. उसाचे उत्पादन निम्याने कमी झाले असून तालुक्याच्या विकासाचा आलेख घसरला असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना पाणी देण्यास, युवकांना नोकरी देण्यास अपयशी ठरले आहेत. उसाचे उत्पादन निम्याने कमी झाले असून तालुक्याच्या विकासाचा आलेख घसरला असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन विविध विकासकांच्या उद्घघाटन व भूमिपुजनाच्या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी छत्रपतीचे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, निरा-भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, तालुकाध्यक्ष अॅड.कृष्णाजी यादव, बाळासाहेब डोंबाळे, विलास माने, वंसत मोहोळकर, राजेंद्र गायकवाड, राजकुमार भोसले, ज्ञानदेव बोंद्रे, सत्यशिल पाटील,कुमार गायकवाड, आबासाहेब शिंगाडे, गोविंद रणवरे, प्रदीप पाटील, डॉ.नंदकुमार सोनवणे, इंटकचे वसंत जाधव, वालचंदनगरच्या सरपंच छाया मोरे उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी सांगितले की, तालुक्यामध्ये गेल्या साडेतीन वर्षामध्ये खडकवासल्याच्या सणसर कट मधून पाण्याचा एक थेंब ही आणता आला नाही.सध्या धरणामध्ये ९० टक्केपाणी साठा असताना तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत. पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उसाचे उत्पादनामध्ये निम्याने घट झाली आहे. चार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. एमआयडीमध्ये खंडणीबहाद्दर, गुडंगिरी वाढल्यामुळे कंपन्यांनी विस्तारवाढ थांबविली आहे. तालुक्यातील युवकांच्या हाताला काम नाही, नवीन शैक्षणीक संकुल उभारले नाही, महाविद्यालयाची तुकडी वाढवता आली नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही अशी तालुक्याच्या अवस्था झाली आहे. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा धंदा सुरु आहे. आम्ही मंजूर केलेल्या कामांचे साडेतीन वर्षामध्ये ट्रकभर नारळ फोडले आहेत. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे दिवस संपले असून परिवर्तनास सुरवात झाली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश सावंत, व आभार श्रीनिवास पाटील यांनी मानले. 

२० वर्षामध्ये तुमचे सायफन चालवले...
विरोधक गेल्या साडेतीन वर्षामध्ये जाहीर सभेमधून २० वर्षात काय केले असा प्रश्‍न विचारत आहेत. आम्ही वीस वर्षामध्ये तुमचे सायफन चालवले. तुम्ही तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना पाणी देण्याऐवजी उद्योजकांच्या शेतीला पाणी दिले. चार गावामध्ये जेवढा शेतकऱ्यांचा उस निघणार नाही. तेवढ्या एका उद्योजकाचा निघणार असल्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Web Title: indapur's Public representatives are careless