खरंच बघा, प्लॉट तुमच्याच नावावर आहे का?

सुधाकर काशीद
बुधवार, 10 मे 2017

राजोपाध्येनगरला परस्पर विकला प्लॉट - मूळ मालकाची पोलिसात तक्रार
कोल्हापूर - बरेच वर्षे रिकामा पडून असलेला प्लॉट हेरायचा आणि त्याचे खरेदी दस्त मिळवून रजिस्टर ऑफिसमध्ये बनावट मालक उभा करून तो प्लॉट विकायचा, असले प्रकार करणाऱ्या एका टोळीने राजोपाध्येनगरमधील प्लॉट विकला असल्याची तक्रार शाहूपुरी पोलिसात दाखल झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी असाच एक प्रकार शाहूपुरी पोलिसांनीच उघड केला होता. बनावट आधार कार्डाच्या साहाय्याने तो प्लॉट विकला होता. आता दाखल झालेली तक्रार साधारण त्याच स्वरूपाची आहे. चौकशीत अशा बनावट खरेदी-विक्री व्यवहाराची साखळीच उघड होण्याची शक्‍यता आहे.

राजोपाध्येनगरला परस्पर विकला प्लॉट - मूळ मालकाची पोलिसात तक्रार
कोल्हापूर - बरेच वर्षे रिकामा पडून असलेला प्लॉट हेरायचा आणि त्याचे खरेदी दस्त मिळवून रजिस्टर ऑफिसमध्ये बनावट मालक उभा करून तो प्लॉट विकायचा, असले प्रकार करणाऱ्या एका टोळीने राजोपाध्येनगरमधील प्लॉट विकला असल्याची तक्रार शाहूपुरी पोलिसात दाखल झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी असाच एक प्रकार शाहूपुरी पोलिसांनीच उघड केला होता. बनावट आधार कार्डाच्या साहाय्याने तो प्लॉट विकला होता. आता दाखल झालेली तक्रार साधारण त्याच स्वरूपाची आहे. चौकशीत अशा बनावट खरेदी-विक्री व्यवहाराची साखळीच उघड होण्याची शक्‍यता आहे.

या निमित्ताने दस्त नोंदणी (रजिस्टर) कार्यालयातील कारभाराचाही पर्दाफाश होणार असून प्लॉटचा मालक वेगळा, पण बनावट मालक चक्क रजिस्टर ऑफिसमध्ये येऊन प्लॉट विक्रीचा व्यवहार करतोच कसा, हा तपासातला महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. खरेदी-विक्री व्यवहार पारदर्शी व्हावा म्हणून थंब इंप्रेशन, दस्तावर छायाचित्र अशी खबरदारी घेण्यात येते. पण या यंत्रणेलाही बनावट विक्री करणाऱ्यांनी आव्हान दिले आहे.

शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार अशोक गणपतराव पाटील यांनी १९७५ मध्ये राजोपाध्येनगरात प्लॉट खरेदी करून ठेवला होता. अधून-मधून ते प्लॉटकडे जात होते. प्लॉटचे सर्व शासकीय, महापालिकेचे कर नियमित भरत होते. आपला प्लॉट कोणी परस्पर दुसऱ्याच्या नावे करेल किंवा आपला प्लॉट चोरीस जाईल हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. पण पंधरा दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका बनावट प्लॉट विक्री प्रकरणाची माहिती त्यांच्या वाचनात आली व त्यांनी आपल्या प्लॉटचा ताजा सात-बारा उतारा काढण्यासाठी अर्ज केला. तेव्हा त्यांच्या प्लॉटची चार महिन्यापूर्वी विक्री झाल्याचे समजले. या प्रकाराने पाटील कुटुंबीय हडबडून गेले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता अशोक पाटील या नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने मतदार ओळखपत्राचा पुरावा सादर करून आपणच मालक असल्याचे भासवत प्लॉट विकला असल्याचे ध्यानात आले. तातडीने त्यांनी प्लॉटच्या खरेदीची मूळ कागदपत्रे, जागेचा घरफाळा भरलेल्या पावत्या पोलिसात सादर केल्या. रजिस्टर ऑफिसलाही त्याच्या प्रती दिल्या व शाहूपुरी पोलिसात तक्रारही दिली. आता पोलिस चौकशीनंतर या फसवणुकीच्या प्रकाराचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल.

या प्रकरणात नेमके काय घडले, हे तपासात जरूर स्पष्ट होईल. पण या प्रकरणामुळे लोकांना सावधगिरीचा पुन्हा एकदा इशारा मिळाला आहे. खूप वर्षांपूर्वी खरेदी करून ठेवलेल्या प्लॉटचा सात-बारा उतारा काढून बघण्याची गज आहे. कारण जुन्या प्लॉट खरेदीचे दस्त सहज मिळतात व त्या आधारे बनावट मालक उभा करून विक्रीचे व्यवहार केले जातात. यात खरेदी घेणारा पूर्ण फसतो. त्याच्याकडे मूळ कागदपत्रे नसल्याने व खरेदी देणाराच बनावट असल्याने त्यांना मालकी सिद्ध करणे अवघड जाते. ज्याने बनावट तंत्राने प्लॉट विकला, त्याच्याकडून पैसे परत मागणे किंवा पैसे परत मिळवणे केवळ अशक्‍य असते. त्यामुळे आपला प्लॉट आपल्या नावावर आहे काय? हे पाहण्याची गरज आहे. आपला प्लॉट कोण चोरून नेतो काय, या समजुतीत राहण्याला आता अर्थ नाही हेच अशा बनावट व्यवहारातून स्पष्ट झाले आहे.

खरेदी केलीच कशी?
खरेदी व्यवहार करताना रजिस्टर ऑफिसमध्ये मूळ मालक, खरेदीदार, साक्षीदार यांनी प्रत्यक्ष हजर राहावे लागते. अशा वेळी मूळ मालकाची खात्री पटवून घेण्यासाठी वेगवेगळे पुरावा सादर करावे लागतात. पण अशा व्यवहारात काय खबरदारी घेतली हे चौकशीत महत्त्वाचे ठरणार आहे.

प्लॉटची जंत्रीच एजंटांकडे
तलाठी, नगरभूमापन कार्यालयाच्या परिसरात प्लॉट खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांचा मोठा वावर आहे. त्यातल्या काही जणांना सात-बारा नंबर तोंडपाठ आहेत. कोणाचा प्लॉट पडून आहे? कोण आर्थिक अडचणीत आहे? प्लॉटवरून भावाभावांत भांडणे कशी आहेत? प्लॉटचा मालक परदेशात कोठे आहे, असली सर्व जंत्री त्यातल्या काही जणांकडे आहे.

Web Title: Indeed, is the plot in your name?