Independence Day : स्वातंत्र्यलढ्याचे ४१७ साक्षीदार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सातारा - महात्मा गांधी यांनी समस्त देशवासीयांना ‘चले जाव’चा नारा दिला आणि स्वातंत्र्याची निकराची लढाई सुरू झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी या लढ्याला यश आले. हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली.

लढ्यातील काहींना भारतीय स्वातंत्र्याची पहिली पहाट पाहायला मिळाली. आज जिल्ह्यात ४१७ स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या पत्नी आहेत, ज्यांनी स्वातंत्र्याचा पहिला उगवता सूर्य पाहिला! 

क्रांतिवीरांचा जिल्हा असलेल्या साताऱ्याने स्वातंत्र्यलढ्यात नेहमी हिरीरीची भूमिका घेतली. सातारा म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी समजली जातो. ‘चलो जाव’ची चळवळ असो की क्रांतिकारी कारवाई; सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी प्रचंड कर्मयोग केला. त्यांचा जाज्वल्य इतिहास अनेक पुस्तकांतून लिखित स्वरूपात समोर आहे. स्वातंत्र्यदिनाचा ७१ वा वर्धापन दिन उद्या (ता. १५) साजरा होत असताना या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण आल्याशिवाय राहात नाही.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या पत्नींना केंद्र व राज्य शासनामार्फत पेन्शन दिली जाते. केंद्र शासनातर्फे २०७ स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना २० हजार रुपये व राज्य शासनाची ५०० रुपये पेन्शन देण्यात येते. राज्य शासनाने २१० स्वातंत्र्यसैनिक घोषित केले असून, त्यांना राज्य शासनामार्फत दहा हजार रुपये पेन्शन दिली जाते.

शिवाय, या स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या पत्नीस शासनामार्फत इतरही सुविधा पुरविल्या जातात. पारतंत्र्याच्या काळात सातारा जिल्ह्यातून क्रांतीची ज्योत पेटली. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले गेले. त्यामध्ये कऱ्हाड तालुका अग्रेसर राहिला होता. सध्या कऱ्हाडमधील २२३ स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नींना पेन्शन दिली जात आहे. सातारा- ५५, जावळी- २, कोरेगाव व पाटण- प्रत्येकी ३२, फलटण- ७, माण- ९, खटाव- ३३, वाई- १८ व खंडाळ्यातील ६ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना पेन्शन सुरू आहे. 

केंद्र शासनाची पेन्शन - २०७ कुटुंबांना
राज्य शासनाची पेन्शन - २१० कुटुंबांना
हयात स्वातंत्र्यसैनिक/पत्नी - ४१७

Web Title: Independence Day 417 witness