Independence Day : स्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सातारा - स्वातंत्र्यदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला आहे. त्यानुसार उद्या (ता. १५) सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयांत तंबाखूमुक्तीची शपथ घेण्याचे नियोजन केले आहे. 

सातारा - स्वातंत्र्यदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला आहे. त्यानुसार उद्या (ता. १५) सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयांत तंबाखूमुक्तीची शपथ घेण्याचे नियोजन केले आहे. 

तंबाखू सेवनाने मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. जगभरात तंबाखू सेवनाने दरवर्षी ७० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी ६० लाख लोकांचा मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे होतो. तर दरवर्षी भारतात सरासरी आठ ते नऊ लाख लोकांचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यू होतो. हे मृत्यूचे प्रमाण थांबवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होण्यासाठी तंबाखूविरोधी जनजागृती करणे आवश्‍यक आहे. त्याचाच भाग म्हणून आपला परिसर आणि शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त होण्याच्या उद्देशाने उद्या स्वातंत्रदिनानिमित्त सर्व शासकीय संस्था, शाळा व महाविद्यालयांत तंबाखूमुक्तीची शपथ घेतली जाणार आहे. तंबाखू सेवनाच्या परिणामाची जागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन केले आहे. याबाबत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे यांनी सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांत उद्या तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात येईल. तसेच प्रभातफेरी काढून जागृती करण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी तंबाखूमुक्त शपथ कार्यक्रमात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात २६ टक्के लोकांना व्यसन
जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षण अहवालानुसार भारतात २८.६ टक्के प्रौढ व्यक्ती या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करतात. महाराष्ट्रात हे प्रमाण २६.६ टक्के आहे.  

Web Title: Independence Day The determination of tobacco free