भारताच्या सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका

Ganpat-Ghadashi
Ganpat-Ghadashi

संगमेश्‍वर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला विजय मिळाल्याच्या अतिउत्साहाने आणि तणावाने गणपत जानू घडशी (वय ६८) यांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. 

आंबव (पोंक्षे) गावचे रहिवासी गणपत घडशी हे क्रिकेट मॅचचे शौकिन होते. मुंबईला शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते गावीच राहत होते. काल (ता. २२) रात्री ११ वा भारत विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना रंगला असताना, आपण पराभूत होणार, या निराशेने ते प्रचंड नाराज होते. शेवटच्या षटकात आपल्या गोलंदाजाने चार धावा दिल्याने त्यांनी रागही व्यक्त केला; पण लगेचच पुढे तीन बळी घेत विजय मिळवल्याने ते आराम खुर्चीतून दोन हात वर करत ताडकन्‌ उठले. अरे आपण जिंकलो, भारताचा विजय झाला, असे मोठ्याने ओरडले आणि धाडकन्‌ जमिनीवर कोसळणार तेवढ्यात मुलगा मंगेशने त्यांना सावरले; पण त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com