भारताला तायक्‍वांदोत तीन सुवर्ण, दोन रौप्य, एक ब्रॉंझपदक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

या देशाच्या खेळाडूंना नमवले 
भारतीय तायक्‍वांदो संघाने संघाने आपला दबदबा दाखवत स्पर्धेचा दुसरा दिवस गाजविला. यामध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्या खेळाडूंवर विजय मिळवत ही पदके जिंकली आहेत. या खेळाडूंचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. 

सोलापूर : 13 व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत (सॅग) भारतीय तायक्‍वांदो संघाने आपला दबदबा दाखवत फाईटमध्ये पदकांची लयलूट केली. भारतीय संघाने तीन सुवर्ण, दोन रौप्य, एक ब्रॉंझपदक पटकाविले. 

 हेही वाचा : "किंग इज बॅक'; विराट पुन्हा ठरला "टॅपर'!

"सॅग'मध्ये भारतीय तायक्‍वांदो संघाने एकूण पाच सुवर्ण, आठ रौप्य, तर चार ब्रॉंझपदकाची कमाई केली आहे. काठमांडू (नेपाळ) येथे दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत भारतीय तायक्‍वांदो संघाची निवड औरंगाबाद येथील "साई' केंद्रात इंडियन ऑलिंपिक असोसिएशन अंतर्गत निवड समितीने भारतीय संघाची निवड केली. भारतीय तायक्‍वांदो संघाचे प्रशिक्षक म्हणून राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण बोरसे यांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत फाईट प्रकारात विविध गटात भारतीय तायक्‍वांदोपटूंनी पदकांची लयलूट केली. 

Image may contain: 7 people, including Pravin Borse, people standing
सूवर्ण पदक विजेती तायक्‍वांदोपटूसह राज्य मार्गदर्शक प्रवीण बोरसे, "आयओए'चे प्रतिनिधी एस. एम. बाली व अन्य पदाधिकारी. 

हेही वाचा : अभी जोश बाकी है! मॅक्‍सवेल आयपीएलच्या लिलावात 

यांनी पटकाविली पदके 
यामध्ये लतिका भंडारी हिने 53 किलो वजन गटात, जरनेल सिंग याने 74 किलो, तर रुदाली बरुआ हिने 73 किलोपेक्षा जास्त वजन गटात सुवर्णपदके पटकाविली आहेत. रौप्यपदके सौरभ याने 63 किलो वजन गटात, गगनजोत याने 63 किलो वजन गटात रौप्यपदके पटकाविली. चैतन्य इनामदार याने 86 किलोपेक्षा जास्त वजन गटात ब्रॉंझपदकाची कमाई केली. या संघाला राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाचे "आयओए'चे प्रतिनिधी एस. एम. बाली यांनी अभिनंदन केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india wins 3 gold, 2 silver, one bronze medal