भारतीय तटरक्षक दलाच्या असिस्टंट कमांडरपदी अपूर्वा होरे

भारतीय तटरक्षक दलाच्या असिस्टंट कमांडरपदी अपूर्वा होरे

जयसिंगपूर - जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर येथील अपूर्वा गौतम होरे हिने भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी स्थान मिळविले. दोन लाखांत तिने राज्यात प्रथम, तर देशात सहावा  क्रमांक मिळविला. २७ जूनला ती प्रशिक्षणासाठी केरळला रवाना होत आहे. तिने मिळविलेले यश जयसिंगपूर  शहराचा नावलौकिक करणारे ठरले आहे.

भारतीय तटरक्षक दल विभागाने डिसेंबर २०१८ मध्ये भरती निश्‍चिती केली होती. डिसेंबरमध्ये झालेल्या परीक्षेचा ११ जूनला निकाल जाहीर झाला. अपूर्वाचे प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर हायस्कूलमध्ये घेतले  असून इंजिनिअरिंगची डिग्री पुणे कमिशन कॉलेज ऑफ इंजिनिअर फॉम ह्युमन येथे चार वर्षांचे शिक्षण घेतले.

वयाच्या १९ व्या वर्षी तिने पॅरा मोटरिंगचे प्रशिक्षण  घेऊन तिने पायलट बनण्याचेही स्वप्न पूर्ण केले आहे. दिवसभरात ती ग्राऊंड प्रशिक्षण अभ्यास यातच वेळ  देऊन स्वप्न तिने साकारले आहे. वडील गौतम इंजिनिअर तर आई वनिता सिव्हिल इंजिनिअर आहेत. आजोबा  सुरेश होरे निवृत्त प्राचार्य आहेत. त्याचबरोबर आजी त्रिशला याही रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राचार्य आहेत. त्यामुळे घरातील बाळकडू घेऊन तिने आज गरूडभरारी घेतली आहे. व असिस्टंट कमांडरपदी तिची निवड झाली.

जे स्वप्न मनाशी बाळगले, ते पूर्ण झाल्याचे समाधान  आहे. कुटुंबीयांचे पाठबळ लाभल्यानेच असिस्टंट कमांडर पदापर्यंत झेप घेता आली. यापुढेही जयसिंगपूरचा नावलौकिक होईल, अशी कामगिरी करू. 
- अपूर्वा होरे,
असिस्टंट कमांडर, भारतीय तटरक्षक दल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com