वाटेगाव येथे आढळले ‘इंडियन स्टार टॉर्टाइज' प्रजातीचे दुर्मिळ कासव

विजय लोहार 
Sunday, 9 August 2020

भारत आणि श्रीलंकेच्या 'ड्राय झोन' मधील प्रदेशात हे कासव आढळून येतात.

नेर्ले - वाटेगाव ता.वाळवा येथे ‘इंडियन स्टार टॉर्टाइज' या प्रजातीचे अत्यंत दुर्मिळ कासव सापडले.वाटेगाव येथे अनिल जाधव यांना त्यांच्या शेतात हे कासव सापडले.कासव सापडल्या नंतर कासव पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.अतिशय छोटे ह दुर्मिळ कासव लोकांच्या कुतूहलाचा विषय बनला.

वाटेगाव येथील अनिल शंकर जाधव हे नेहमी प्रमाणे शेतात गेले असता. शेणे- वाटेगाव रस्त्यालगत असणाऱ्या शेतात हे दुर्मिळ ‘इंडियन स्टार’ जातीचे कासवाचे पिल्लू सापडले.अत्यंत सुंदर असे हे कासव जाधव यांनी शिराळा वन विभागाशी संपर्क करून वन कर्मचारी अंकुश खोत यांच्याकडे सुपूर्त केले.

गैरसमज व अंधश्रद्धा
‘इंडियन स्टार टॉर्टाइज' घरात ठेवल्यास घरात भरभराट अन् नोकरी धंद्यात प्रगती होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वाचा - जोतिबाला जाण्यासाठी आता 'या' रस्त्याचाच आधार  

या प्रदेशात आढळते

भारत आणि श्रीलंकेच्या 'ड्राय झोन' मधील प्रदेशात हे कासव आढळून येतात. भारतात आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील खेड्यांजवळील वनक्षेत्रात इंडियन स्टार कासव आढळतात.

बाळगण्यास बंदी
दक्षिण भारतामध्ये आढळणारे इंडियन स्टार कासवे ही वन्यजीव संरक्षण अधिनयानुसार संरक्षित असून त्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी आहे. तसेच, ती जवळ बाळगणे, पाळणे यास बंदी आहे.
 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Star Tortoise species found at Vategaon sangli