भारतीय तायक्‍वांदो संघाला दोन सुवर्ण, सहा रौप्य, तीन ब्रॉंझपदके 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

"साई' केंद्रात खेळाडूंचा कसून सराव 
औरंगाबादच्या "साई' केंद्रात इंडियन ऑलिंपिक असोसिएशन अंतर्गत निवड समितीने भारतीय संघाची निवड केली. या संघाचा सराव अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आला. या वेळी फाईट आणि फुमसे या दोन्ही प्रकारांचा कसून सराव करुण घेण्यात आला. तसेच, खेळाडूंचा फिटनेसही तपासण्यात आला. 

सोलापूर : भारताने 13 व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत (सॅग) भारतीय तायक्‍वांदो संघाने पदकांचे खाते उघडताना फुमसे प्रकारात दोन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन ब्रॉंझपदकाची कमाई केली. 
काठमांडू (नेपाळ) येथे दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत भारतीय तायक्‍वांदो संघाची निवड औरंगाबाद येथील "साई' केंद्रात इंडियन ऑलिंपिक असोसिएशन अंतर्गत निवड समितीने भारतीय संघाची निवड केली. भारतीय तायक्‍वांदो संघाचे प्रशिक्षक म्हणून राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण बोरसे यांची निवड करण्यात आली होती.

हेही वाचा : भारताच्या पाच खेळाडूंचा मुख्य फेरीत प्रवेश

 

Image may contain: 5 people, people smiling
काठमांडू (नेपाळ) येथे सुरु असलेल्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत फुमसे प्रकारात विजेता भारतीय ताजक्‍वांदोचा संघ. 

 

या स्पर्धेत फुमसे प्रकारात विविध गटात भारतीय तायक्‍वांदो संघाने दोन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन ब्रॉंझ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये मुलांच्या गटात लॅथू पाविया (ब्रॉंझ), राहुल जैन (रौप्य), गंगफुन गंशा (ब्रॉंझ), रूपा भोयर (रौप्य), हर्षा सिंग (ब्रॉंझ), प्राजक्‍ता अकोलकर (रौप्य), जोडीदार गटात हर्षा सिंग व गौरव सिंग (सुवर्ण), शिल्पा थापा व कुणाल कुमार (रौप्य), मुलींच्या सांघिक गटात लॅथू पाविया, झुला व डॅनियल, तर मुलांच्या सांघिक गटात सोयम नालांबा, रणजित कुमार व लयशराम डिंकुसिंग या टीमने सुवर्ण पदकाची कमाई केली. 

हेही वाचा : या राज्याचे क्रीडा विकास व्हीजन तयार 

या संघाला राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाचे "आयओए'चे प्रतिनिधी एस. एम. बाली यांनी अभिनंदन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian taekwondo team gets two gold, six silver, three bronze medals