विट्यात दीड लाखाची देशी, विदेशी दारु पोलिसांनी पकडली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

एक नजर

  • विटा - कऱ्हाड रस्त्यावर कृष्णलिला मंगल कार्यालयानजीक कारवाई. 
  • बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी मोटार सांगलीच्या विशेष पोलिस पथकाने पकडली.
  • १ लाख ५२ हजार १६० रूपयांची देशी, विदेशी दारूचे बॉक्स, रोख अडीच हजार रूपये व ३ लाख ५० हजार रूपये किंमतीची मोटार असा एकूण ५ लाख ४ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त

विटा - येथील विटा - कऱ्हाड रस्त्यावर कृष्णलिला मंगल कार्यालयानजीक बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी मोटार ( ता. ४ ) रात्री नऊच्या सुमारास सांगलीच्या विशेष पोलिस पथकाने पकडली. १ लाख ५२ हजार १६० रूपयांची देशी, विदेशी दारू व बिअरचे बॉक्स, रोख अडीच हजार रूपये व ३ लाख ५० हजार रूपये किंमतीची मोटार असा एकूण ५ लाख ४ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत विशेष पोलिस पथकातील पोलिस गौतम भिमराव कांबळे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली. दारू वाहतूक करणाऱ्या मंगेश उत्तम जाधव ( वय २३, रा. सुर्यनगर, विटा ) याला ताब्यात घेऊन अटक केली तर मालक बाबा पटेल ( विटा ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विटा - कऱ्हाड रस्त्यावरील कृष्णलिला मंगल कार्यालयानजीक मोटारीची तपासणी करण्यात आली. यावेळी मोटारीत १ लाख ५२ हजार १६० रूपये किंमतीचे देशी व विदेशी दारूचे बॉक्स सापडले. बॉक्समध्ये एकूण नऊशे बेचाळीस बाटल्या होत्या. मोटारीचा चालक मंगेश जाधव याची पोलिसांनी झडती घेतली असता रोख अडीच हजार रूपये सापडले. दारू वाहतूकासाठी वापरलेली मोटार व दारू जप्त करण्यात आली. असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: indigenous, foreign liquor seized in Vita