मोहोळ - पंचायत समितीच्या आवारात बेशिस्त पार्कींग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुका पंचायत समितीच्या आवारात दुचाकी व चारचाकी वाहने बेशिस्तपणे लावल्याने कामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण होत आहे, त्यांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढत जावे लागते याकडे गट विकास अधिकारी यांच्यासह पदाधिकारी कोणाचेही लक्ष नाही. 

पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातून त्यांच्या कामासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येतात त्यात महिला सरपंच, ग्रामसेवक, विविध खात्याचे कर्मचारी, नागरिक यांचा समावेश आहे. विविध पक्षांचे नेतेही आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनातून तेथे येतात मात्र आणलेली वाहने बेशिस्त पणे कुठेही लावली जातात,पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात मोठी जागा असतानाही वाहने व्यवस्थित लावली जात नाहीत,सर्व सामान्या सोबत खुद्द अधिकाऱ्यांनाही याचा त्रास जाणवतो.

या पूर्वीचे गटविकास अधिकारी डी गंगाधरण असताना मोठी शिस्त लागली होती,मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखी अशी परिस्थिति झाली आहे,पंचायत समिती आवारात दोन सुरक्षा रक्षक खुर्ची टाकून बसून असतात त्यांनी कितीही जीव तोडून सांगितले तर त्यांचे कोणी ऐकत नाही. पंचायत समितीच्या ग्रामसेवक व अन्य कर्मचारी यांनाच शिस्त नाही तर इतरांचे काय?आपापल्या सोई प्रमाणे वाहने लावली जातात सम्बंधित अधिकारी लक्ष देतील काय?अशी विचारणा होत आहे.

Web Title: indiscipline parking in mohol tehsil office