हुपरीतील इंदुमती बेघर संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

बाळासाहेब कांबळे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर/ हुपरी - हुपरी येथील गट क्र.९२५/८ अ १ ही सरकार हक्कातील जमिन गावातील बेघर कुटुंबांना देण्याच्या मागणीसाठी छत्रपती राणी इंदूमती बेघर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले.

हुपरी हे औद्योगिक शहर आहे. शहराची वाढ झपाटयाने होत आहे. वाढत्या नागरीकरणाच्या मानाने रहिवासी कारणासाठी लागणारी जमिन अपूरी पडत आहे. शहरात अनेक मागासवर्गीय, दारिद्रय रेषेखालील कामगार, गरजू, बेघर कुटुंबे भाड्याच्या घरात राहत आहेत. जमिनीच्या किंमतीमुळे जागा खरेदी करून स्वतःचे घर उभारणे अशक्य झाले आहे. अशा बेघर कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, यासाठी येथील गट क्र ९२५/८ अ १ क्षेत्र ७ हे १७ आर. ही सरकार हक्कातील जमिन रहिवासी कारणासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली आहे. या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधून देऊन हक्काचा निवारा मिळावा, अशी मागणी असल्याचे राणी इंदूमती बेघर संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी सांगितले.

उदय कंगणे, दिलीप शिंगाडे, हिरालाल कांबळे, कविता साळुंखे, कल्पना लोहार, आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

Web Title: Indumati Beghar Union agitation on Collector office