काँग्रेसला धक्का; निष्ठावंताना न्याय मिळत नाही म्हणत, महिला अध्यक्षाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

- सोलापूर कॉंग्रेसला धक्का
- महिला आघाडी अध्यक्षाचा राजीनामा 

सोलापूर : पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना कॉंग्रेसमध्ये न्याय मिळत नाही. आतपर्यंत चार वेळा मागणी करूनही दक्षिण सोलापूर मतदारसंघात उमेदवारी मागितल्यानंतरही संधी दिली नाही, असा आरोप करीत कॉंग्रेस सदस्यत्व आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा इंदुमती अलगोंडा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. 

कुठपर्यंत झालीय तयारी; निवडणूक आयोगाचा आढावा

अलगोंडा पाटील म्हणाल्या,"माझे वडील भीमराव पाटील वडकबाळकर हे 40 वर्षे कॉंग्रेसचे कार्यकर्ते, नेते होते. ते कायम कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी दिली नाही. आजपर्यंत मी केलेले कार्य, जनतेप्रती कार्याचे ध्येय व जनसंपर्क पाहता मी नक्कीच निवडून आले असते अशी मला खात्री होती. या माध्यमातून मला जनतेची अधिक चांगल्याप्रकारे सेवा करता आली असती.''

Image may contain: 1 person, sitting, living room, indoor and close-up

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे मला मानसकन्या मानतात. त्यामुळे त्यांनी मला उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. निष्ठावंतांना विश्‍वासात घेतले तर नेतृत्व फुलते. मात्र एकनिष्ठांऐवजी आयाराम-गयारामांना जवळ घेण्याची भूमिका घेतली जाते. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यापुढे काय करायचे ते कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही अलगोंडा पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indumati Patil resigns as Solapur Womens Congress district chief