इंदुरीकर महाराजांनी शेतकऱ्यांना दिला हा सल्ला

Farmers paid double Compensation in Atpadi of Sangali District
Farmers paid double Compensation in Atpadi of Sangali District

तुंग : पैशांचा हव्यास बाजूला ठेवून संयम धारण करा. शेती करीत काहीतरी त्याला जोडधंदा सुरू करा. शेतकऱ्यांनो खचू नका, निराश होऊ नका. तुमच्याही आयुष्यात एक दिवस सोन्याचा येईल. असा संदेश निवृत्ती महाराज इंदुरीकर (देशमुख) यांनी दिला. 

ते कवठेपिरान (ता. मिरज) येथे कै. हिंदकेसरी पै. मारुती माने (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर गीता सुतार, गीतादेवी मारुती माने, नगरसेविका आरती वळवडे, माजी जि.प. सदस्य भीमराव माने उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना सल्ला देताना ते म्हणाले वारंवार तीच ती पिके घेतल्याने शेतीची ताकद कमी झाली आहे. रासायनिक खते व औषधांच्या अतिवापराने जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यात गाईच नसल्याने शेणखत उपलब्ध नाही. बांधावर असणारी झाडे कमी झाली. पाण्याचे नियोजन नसल्याने शेतीचे गणित बिघडू लागले आहे. तेव्हा त्याला पर्यायी जोडधंदा चालू करा. 

कीर्तनातून मुला-मुलींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,""प्रत्येक आई-वडिलांची मान खाली जाईल, असे चुकूनही वागू नका. स्थानिक राजकारणाचा गावाच्या विकासावर परिणाम होत आहे. शासनाकडून ग्रामपंचायतींना आलेला 25 टक्के निधी आज खर्च न झाल्याचे चित्र आहे. प्रत्येक गावात एक वाचनालय आणि व्यायाम शाळा उभारा. तरच युवकांचे भविष्य उज्ज्वल आहे.'' 

यावेळी महाराष्ट्र शासनाचा ब्रॅंड अँबेसिडर चेतन उचितकर, प्रसिद्ध मानसोउपचार तज्ज्ञ कालिदास पाटील, अर्जुन माने, सागर पाटील, अध्यक्ष शब्बीर पठाण, अनिल खोत, श्रीकांत बोधले, ग्रामविकास अधिकारी अविनाश धनवडे, ज्ञानेश्वर ज्ञानदीप मंडळाचे वारकरी-टाळकरी तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजन हिंदकेसरी (स्व.) मारुती माने उत्सव समिती व पै. भीमराव माने युथ फाऊंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com