कुख्यात तीन गुन्हेगार कारागृहात

सूर्यकांत वरकड
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नगर : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या सराईत व रेकॉडवरील तीन गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीएअंतर्गत (स्थानबद्ध) कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यास काल उशिरा मंजुरी मिळाळी. तिघांचीही नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली.

नगर : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या सराईत व रेकॉडवरील तीन गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीएअंतर्गत (स्थानबद्ध) कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यास काल उशिरा मंजुरी मिळाळी. तिघांचीही नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली.

महेंद्र बाजीराव महारनोर (वय 26, रा. डोमाळवाडी, वांगदरी, ता. श्रीगोंदे), अजय उर्फ अर्जुन गणेश पाटील (वय 20, रा. गांधीनगर, कोपरगाव), सुदाम उर्फ दीपक भास्कर खामकर (वय 28, रा. मांडवे खुर्द, ता. पारनेर) अशी त्यांची नावे आहेत.

वाळू तस्करी, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य गुन्हेगार, धोकादायक व्यक्‍ती आणि संघटित गुन्हेगारांच्या विघातक कृत्याला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी गेल्या काही दिवसांपासून एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यास सुरवात केली. आतापर्यंत पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वरील तिघांना एमपीडीएअंतर्गत कारवाईसाठी कोपरगाव शहर, घारगाव (ता. संगमनेर), श्रीगोंदे पोलिसांनी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविले होते.

पोलिस अधीक्षकांची मंजुरी मिळाल्यानंतर ते प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या प्रस्तावाला काल उशिरा मंजुरी दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वरील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची रवानगी नाशिक कारागृहात केली. आता एक वर्ष त्यांचा मुक्काम नाशिक कारागृहात राहणार आहे.
.

आरोपी आणि दाखल गुन्हे
महेंद्र महारनोर : श्रीगोंदे व शिरूर (जि. पुणे) पोलिस ठाण्यात खून, मारहाण, अपहरण, चोरी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, रस्तालूट असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. 

अजय पाटील : कोपरगाव पोलिस ठाण्यात मारहाण, खुनाचा प्रयत्न, अपहरण, जिवे मारण्याची धमकी असे पाच गुन्हे दाखल आहेत.

सुदाम खामकर : पारनेर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, रस्तालूट, चोरी, जिवे मारण्याची धमकी असे चार गुन्हे दाखल आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: infamous three criminal prison in mpda