मंगळवेढा येथील ज्वारी पिकावर अळीचा प्रादुर्भाव

हुकूम मुलाणी 
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यात ज्वारीवर सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. परतीच्या पावसाने घायाळ झालेल्या शेतकरी ज्वारीवर पडलेल्या लष्करी अळीमुळे आणखीनच त्रासला आहे.

मंगळवेढा : राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यात ज्वारीवर सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. परतीच्या पावसाने घायाळ झालेल्या शेतकरी ज्वारीवर पडलेल्या लष्करी अळीमुळे आणखीनच त्रासला आहे. अळीचा प्रादुर्भाव न रोखल्यास त्याचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.

तालुक्यात सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव ज्वारी पिकावर दिसून येऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षापासून रब्बीचा हंगाम समाधानकारक न झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीस सामोरे जावे लागले आहे, अशा परिस्थितीत अल्पशा पावसावर पेरणी केलेल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्याला लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागल्यामुळे ज्वारीचे पीक या अळीच्या विळख्यात सापडल्याने मंगळवेढा शिवार, मुंढेवाडी, बोराळे, ब्रम्हपुरी येथील शेतकरी चिंतातूर आहे. मंगळवेढा शिवारातील चोरीवर ज्वारीतील गोडव्याची प्रमाण अधिक असल्यामुळे हे प्रमाण लष्करी आळीस अधिक पोषक आहे.

तालुक्यामध्ये बागायत क्षेत्रापेक्षा जिरायत क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतीमध्ये केलेल्या खर्चापेक्षा निघणारे उत्पन्न कमी निघत असल्यामुळे शेतकऱ्याला कर्जबाजारी व्हावे लागणार आहे. गतवर्षीच्या दुष्काळ नदीपासून रब्बीचे क्षेत्र पूर्णपणे बघितल्यामुळे शेतकऱ्यावर शासनाने अन्याय केल्याची घटना ताजी असताना सध्याच्या रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र यामध्ये मोठ्या संकटात सापडणार आहे.

उत्पादनासाठी केलेला खर्च आणि उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर माेठे संकट उभे राहिले आहे. - आबा खांडेकर, शेतकरी (शिरनांदगी)

ज्वारीवरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एमामेकटींन बेंनझोयेट 40 ग्रॅम प्रति 100 लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावीॉ. फवारणी करताना 100 लीटर पाण्यात 2 किलो युरिया टाकावा.- प्रशांत काटे, कृषी सहायक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infection of larvae on sorghum crop