मोहोळ: इंधन दरवाढीमुळे रमजानवर महागाईचे सावट

राजकुमार शहा
सोमवार, 4 जून 2018

ग्रामीण भागात ही मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा पारंपारीक व्यवसाय शेतीच आहे. सध्या शेतकरी अडचणीत असल्याने ग्रामीण भागातील या समाजाची मोठी आर्थिक अडचण झाली आहे. सध्या बाजारात ८ ते १० प्रकारची खजुर दाखल झाली आहे. कमीत कमी शंभर जास्तीत जास्त चारशे रुपये किलोचा दर आहे.

मोहोळ : मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजाण सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र मोहोळ येथील बाजार पेठेत अद्यापही शुकशुकाट दिसत आहे. ग्राहकांचा साहित्य खरेदीला अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही. सुक्या मेव्यावरील आयात कर व इंधन दरवाढीमुळे रमजानवर महागाईचे सावट पसरल्याचे चित्र आहे.

रमजान म्हणजे मुस्लिम समाजाची दिपावळीच. यावर्षी बदाम, काजु या सह अन्य सुक्या मेव्यावरील आयात कर वाढल्याने या वस्तुचे दर गेल्या वर्षीपेक्षा सरासरी शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले आहेत. तर, पेट्रोल व डिझेल या इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचे दर वाढले. त्याचा परिणाम म्हणुन तयार व फाडीव कपडे महागले आहेत. तयार कपडे नगाला ४ ते ५ रुपये तर फाडिव कपडे मिटरला ५ ते ७ रुपये महागले आहेत.

ग्रामीण भागात ही मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा पारंपारीक व्यवसाय शेतीच आहे. सध्या शेतकरी अडचणीत असल्याने ग्रामीण भागातील या समाजाची मोठी आर्थिक अडचण झाली आहे. सध्या बाजारात ८ ते १० प्रकारची खजुर दाखल झाली आहे. कमीत कमी शंभर जास्तीत जास्त चारशे रुपये किलोचा दर आहे. रव्याचे भाव वाढले नाहीत, पण शेवई तयार करण्याच्या मजुरीत वाढ झाल्याने ती ही महागली आहे. 

बाजारपेठेतील गेल्या व चालु वर्षातील सुक्या मेव्याचे प्रतीकिलोचे दर पुढीलप्रमाणे 
चालु वर्षीचे दर 

बदाम बी   900 रुपये किलो 
काजु       1100  
चारोळे       900
पिस्ता     2000 
अक्रोड    1300 

गेल्या वर्षीचे दर 
बदाम बी       800 रुपये किलो 
काजु        1000
चारोळे      700 
पिस्ता       1600 
अक्रोड      900

Web Title: inflation effect on Ramzan in Mohol