शाहिरीतून सांगितली राजर्षींची महती 

 Information about Rajarshi from Shahri
Information about Rajarshi from Shahri

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा सुरु झाला आहे. शुक्रवारी समाधी परिसरामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजाच्या जीवनावर शाहिरी कार्यक्रम आयोजीत केला होता. यामध्ये शाहिर दिलीप सावंत, सदाशिव निकम, संजय जाधव ,समाधान कांबळे यांनी सहभाग घेतला. 

दरम्यान,शाहू समाधी स्मारक मुख्य सोहळ्याची पुर्ण तयारी झाली आहे. दसरा चौक येथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे. तर शाहू समाधी स्मारक, सिध्दार्थनगर येथेही कार्यक्रमाची पुर्ण तयारी झाली आहे. हा परिसर आकर्षक रोषणाईने उजाळून निघाला आहे. सिध्दार्थनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहू जीवन चरित्रावर आधारीत विविध फलक उभारण्यात आले आहे. दरम्यान, उद्या शनिवारी(ता.18) सकाळी नउ वाजता बिंदू चौक येथून समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सर्व चौक, पुतळे आदी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. 

या पोवाड्याच्या कार्यक्रमात कलाकारांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुजरा, शाहू महाराजांचे चरित्र, बहिर्जी नाईक यांची , राधानगरी धरण या विषयावर शाहिरी मधून आपली कला सादर केली. यावेळी दिप्ती सावंत हिने छत्रपती ताराराणींचा पोवाडा व तृप्ती सावंत हिने शिवजन्माचा पवाडा सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी महापौर ऍड.सौ.सुरमंजिरी लाटकर व आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 

दरम्यान शाहिरी कार्यक्रमाचा प्रारंभ महापौर ऍड.सौ.सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्षनेता विजय सुर्यवंशी, प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके, नगरसेवक अशोक जाधव, जय पटकारे, तौफिक मुल्लानी, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त धनंजय आंधळे, सहा.आयुक्त दिवाकर कारंडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, रावसाहेब चव्हाण, उपशहर रचनाकार नारायण भोसले, परवाना अधीक्षक राम काटकर, भांडार अधिक्षक सुनिल बिद्रे, लेखापाल प्राथमीक शिक्षण समिती राजीव साळोखे, सहा.उद्यान अधिक्षक अर्पणा जाधव, माजी नगरसेवक राजू लाटकर, नंदकुमार मोरे, रियाज सुभेदार, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, महापालिकेचे अधिकारी/कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपलस्थित होते. 

समता दिंडीचे आयोजन 
उद्या शनिवारी(ता.18) समता दिंडीचे आयोजन सकाळी नउ वाजता बिंदू चौक येथून होणार आहे.या समता दिंडीमध्ये शाहू प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन महापौर ऍड.लाटकर,आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. 

कार्यक्रमाचे उभारल फलक 
शाहू समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे फलक ठिकठिकाणी महापालिकेने उभे केले आहेत. या फलकावर केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचेच फोटो आहेत. या फलकावर इतर कोणताही पदाधिकारी,नेता यांचे फोटो लावलेले नाहीत.महापालिकेने अगदी सुरवातीपासून काळजी घेतली आहे. विशेषता महापालिकेने उभा केलेल्या होर्डिंग्ज अशा प्रकारची आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com