जखमी शेतकऱ्याला सहकारमंत्र्यांची मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

सोलापूर - होनमुर्गी फाट्याजवळ अपघातातील जखमी शेतकऱ्याला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मदत केली. सहकारमंत्री देशमुख निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते. शेतकऱ्याचा अपघात झाल्याचे दिसल्यानंतर त्यांनी वाहन बाजूला घेतले. स्वत:च्या वाहनातून जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी सोलापूरला पाठविले. भीमाशंकर यल्लप्पा कंगारे (वय 55) असे त्याचे नाव आहे. कंगारे आज सकाळी दुचाकीवरून भाजी घेऊन निघाले होते. चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने ते खाली पडले. त्याच वेळी तेथून निघालेल्या देशमुख यांनी स्वतःच्या वाहनातून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठविले. इतकेच नव्हे, तर त्यांनी रुग्णालयात डॉक्‍टरांशी फोनवरून संवादही साधला.
Web Title: injured farmer help by subhash deshmukh