खासगी शाळांच्या शिक्षकांवर अन्याय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

सोलापूर - महाराष्ट्र शिक्षण सेवेच्या गट क मधील कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने उपशिक्षणाधिकारी या पदासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व महापालिका अंतर्गत शाळा व आश्रमशाळेतील शिक्षकांना अपात्र केले आहे. त्यामुळे या शिक्षकांना उपशिक्षणाधिकारी पदाची स्पर्धा परीक्षा देता येणार नाही. हा एकप्रकारे त्यांच्यावर अन्याय असल्याचे बोलले जात आहे. 

उपशिक्षणाधिकारी पदासाठी 13 ऑगस्टला स्पर्धा परीक्षा होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षेला हे शिक्षक बसू शकतात. मग, शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या पदासाठी का नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. इतर शासकीय कर्मचारी हे पूर्ण शासकीय आहेत; पण खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकही शासकीयच आहेत, शासनच त्यांना पगार देते, मग हा दुजाभाव का, असेही विचारले जात आहे. 

अनुदानित खासगी शाळांमधील अतिशय कार्यक्षम आणि अभ्यासू शिक्षकांना ही संधी मिळालीच पाहिजे. तो त्यांचा नैसर्गिक हक्क आहे. या शिक्षकांना मुख्याध्यापक पदाशिवाय दुसरे पदोन्नतीचे पद नाही. सदर परीक्षेस बसण्याची खासगी अनुदानित शिक्षकांना परवानगी देऊन 50 टक्के पदे ही खासगी अनुदानित शिक्षकांमधून भरावीत, अशी मागणी जोर धरत आहे. 

सहा जूनपर्यंत भरा ऑनलाइन अर्ज 
या स्पर्धा परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पात्र शिक्षकांनी सहा जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 

Web Title: Injustice to private school teachers