15 ऑगस्टनिमित्त डॉ अमोल बुरांडे यांची हुतात्मा जवानासाठी अभिनव संकल्पना 

दावल इनामदार 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

ब्रह्मपूरी (सोलापुर) : बेगमपुर (ता.मोहोळ) येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अमोल बुरांडे यांनी 15 ऑगस्ट निमित्त शहीद जवानासाठी संकल्पना आपल्या रुग्णालयामधे राबवली असून वाढती लोकसंख्या हा भारत देशाचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. पण ह्याच लोकसंख्येकडे आपण आपली ताकत म्हणुन पाहिले तर वेगळे चित्र दिसेल.

जसे की एखादया शहीद जवानाच्या कुटुंबासाठी  सहायता निधी म्हणुन १२५ कोटी भारतीय जनतेने प्रत्येकी एक रुपया जमा केला तर १२५ कोटी रूपये जमा होतील. हीच आपल्या लोकसंख्येची ताकत आहे. जरी १० % रक्कम ग्राह्य धरली तर १२ .५ कोटी रुपये जमा होतील.

या संकल्पनेवरच आधारीत मी माझ्या दवाखान्यात "शहीद सहायता निधी " नावाने एक पेटी ठेवली आहे. मी व माझे कुटुंबीय रोज प्रत्येकी एक रुपया या पेटीत टाकणार आहोत. त्याचबरोबर  दवाखान्यात येणारे माझे मित्र, माझे आप्तेष्ट, रुग्ण, रूग्णाचे नातेवाईक या पेटीत एक रूपया टाकुन सहकार्य करतील.

ही संकल्पना साकार करण्यासाठी मला आरिफभाई पठाण, बालाजी लोहकरे, सादिक तांबोळी, सुशील वाघमारे, मुजीब चौधरी, सागर धडके, इरफान जहागिरदार, दयानंद सरवळे, गणेश लाड, गणेश लोखंडे, सचिन भोई, लियाकत मणेरी, मोहसीन मणेरी, शेखर चांडोले, रियाज बागवान यासारख्या तरुण पिढीचे मोलाचे सहकार्य लाभले त्याचबरोबर माजी सरपंच असलमभाई चौधरी, तंटामुक्त अध्यक्ष आप्पा पाटील, ग्रामपंचायत सदस्य माणिक तांबोळी, सर्वपक्षीय नेते बाळासाहेब जामदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

भविष्यात मी व माझे सहकारी ही संकल्पना गावातील प्रत्येक तालुक्यामधे, जिल्ह्यामधे कापड दुकानात, किराणा दुकानात, हॉटेल, इतर व्यावसायिक राबविणार आहोत असे दै.सकाळ. शी बोलताना म्हणाले.

Web Title: Innovative concept by Dr. Amol Burandefor jawans on the occasion of 15th August