आटपाडी तालुक्यात खड्ड्यात पुरलेल्या आैषध साठ्याची कसून चाैकशी

सदाशिव पुकळे 
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

झरे, ता आटपाडी - येथे औषधाचा साठा खड्ड्यात पुरल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याची प्रशासनाने दखल घेतली. आज प्राथमिक चौकशीसाठी पथक सकाळी नऊ वाजता दाखल झाले.

झरे, ता आटपाडी - येथे औषधाचा साठा खड्ड्यात पुरल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याची प्रशासनाने दखल घेतली. आज प्राथमिक चौकशीसाठी पथक सकाळी नऊ वाजता दाखल झाले.

पथकाने सर्व दवाखान्याची पाहणी केली. ज्या खड्यात औषधाचा साठा सापडला त्याचीही पाहणी केली. काल रात्री पंचनामा करण्यात आला  होता. त्याच पंचनाम्यातील औषधाचा साठा आहे का याची तपासणी करण्यात आली. दप्तर तपासणीप्रमाणे औषधे आहेत का हे ही पाहण्यात आले. या संदर्भातील चौकशी उशिरापर्यंत सुरु होती.

संपूर्ण चौकशी संपल्यानंतर जे कोणी  दोषी अधिकारी असतील त्याच्यावर कारवाई होईल .तसेच दवाखान्याची दुरावस्था झाली आहे  त्याची ताबडतोब दुरुस्ती करण्यात येईल. येथे अपुरा  कर्मचारीवर्ग आहे तो ताबडतोब भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल. 

-  डॉ विजय सावंत,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

या पथकामध्ये जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय सावंत, प्रभारी गटविकास अधिकारी मिरगणे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी कांबळे, डॉ मोरे, डॉ चव्हाण, डॉ गावडे, डॉ राउत ग्रामसेवक दत्ता गळवे. याचा समावेश होता.  

 

Web Title: Inquiry of medicines found in Pothole Atapadi Taluka incidence