नातेपुत्यातील दोघांची एटीएस पथकाकडून कसून चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नातेपुते : नालासोपारा येथील वैभव राऊत व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना एटीएस पथकाने अटक केली आहे. यामधील सुधन्वा सुधीर गोंधळेकर याचे नातेपुते येथील दोन मित्र प्रसाद देशपांडे व अवधूत पैठणकर यांच्याकडे आज (ता. 11) पुणे व सोलापूरच्या एटीएस पथकाने कसून चौकशी केली. चौकशीच्या वेळी गोंधळेकर यासही तपास पथकाने नातेपुते येथे आणले होते. 

नातेपुते शहरातील प्रसाद सुधाकर देशपांडे हा पुण्यातील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात शिक्षण घेताना 2001 पासून त्याची व गोंधळेकर याची मैत्री आहे. महाविद्यालयीन जीवनापासून मैत्री असल्याने तो या भागात व्यवसायानिमित्ताने आल्यानंतर तो मला भेटण्यास येत असतो. त्या प्रमाणे मंगळवारी (ता. 7) तो आला असता माझ्याकडे दोन तास होता. त्या वेळी माझ्या घरी अवधूत पैठणकर हा आला होता. त्या वेळी आम्ही तिघांनी घरी एकत्र जेवण केले होते. कथित बॉम्ब बनवण्याच्या प्रकरणात माझा व माझ्या मित्राचा कोणताही संबंध नाही. पोलिस चौकशी करून गेलेले आहेत. या प्रकरणात आमचा कोणताही संबंध नाही अशीच भावना अवधूत पैठणकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

प्रसाद देशपांडे हा एका सहकारी पतसंस्थेत कामाला असून अवधूत पैठणकरचे स्वतःचे कलाविश्‍व नावाचे फर्निचर दुकान आहे. एटीएस पथक नातेपुते मध्ये आले आहे याची बातमी वाऱ्या सारखी गावात पसरताच पैठणकर व देशपांडेंच्या घरी अनेकांनी धाव घेतली. दोघेही कोणत्याही दहशतवादी कारवाईत कधीच सहभागी होऊ शकत नाहीत असे ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले.

Web Title: inquiry of two by ATS squad in natepute