असुरक्षित साक्षीदार कक्ष कोल्हापुरात

ओंकार धर्माधिकारी
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - बाल लैंगिक अत्याचार खटल्यातील पीडित किंवा साक्षीदार अल्पवयीन असतात. न्यायालयातील वातावरण, पोलिस, आरोपी यामुळे साक्षीदार घाबरतात. त्याचा फायदा आरोपीला होतो. असे होऊ नये यासाठी प्रत्येक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये असुरक्षित साक्षीदार कक्ष स्थापन करण्याचे आदेश आहेत. मात्र, देशात असे केवळ दोनच कक्ष असून, कोल्हापुरातील जिल्हा न्यायालयात नुकतीच या वैशिष्ट्यपूर्ण कक्षाची स्थापना झाली. दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात पहिला कक्ष आहे. 

बाल लैंगिक अत्याचारामधील पीडिताची मानसिक अवस्था चांगली नसते. अशा वेळी त्याला साक्ष देताना, घडलेला प्रसंग कथन करताना असुरक्षित वाटते. अनेकवेळा आरोपीला पाहिल्यावर पीडित बालकाला अत्याचाराच्या घटना आठवतात व भीतीने ते रडू लागतात, त्यांना साक्ष देता येत नाही. यासाठी अशा कक्षाची उभारणी केली जाते. यामध्ये साक्षीदाराला आरोपी दिसत नाही. पीडिताची जागा न्यायाधिशांच्याजवळ असून त्याला पालकांसोबते बसण्याची परवानगी असते.

असुरक्षित साक्षीदार कक्षाची वैशिष्ट्ये 
आरोपी, साक्षीदार यांना बसण्याची स्वतंत्र जागा व स्वतंत्र मार्ग
पीडिताला किंवा साक्षीदाराला आरोपी दिसत नाही 
खेळणी, पाणी, कोच असलेला साक्षीदार कक्ष
अपंगांसाठी स्वतंत्र रॅम्प
आरोपीला आणणे शक्‍य नसल्यास व्हिडिओ कॅन्फरसिंगची सोय.

Web Title: Insecure Witness Room in Kolhapur Child Sexual Abuse Case