आंधळगावातील दुष्काळी परिस्थिती पाहणी अवघ्या २० मिनिटात

प्रशांत माळी
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

आंधळगाव - तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाने आंधळगांवात अवघ्या २०-३० मिनिटात पहाणी केली. पाण्याअभावी सुकून गेलेली ज्वारी, भुईमुग, तुर या पिकांची पाहणी यावेळी करण्यात आली. पण एका गावाच्या पाहणीवर उपाय योजना कधी करणार याकडे मात्र तालुक्यातील 79 गावाचे लक्ष लागले.

आंधळगावात केंद्रीय दुष्काळी पथकाचे प्रमुख सुभाषचंद्र मिना, सदस्य एम.जी.टेंभूर्णे, विजय ठाकरे यांनी संवाद साधल. यावेळी विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर, राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा आधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर, प.स. सभापती प्रदिप, खांडेकर, शिवाजीराव काळुंगे, शिवाजीराव नागणे, शैलाताई गोडसे, येताळा भगत, तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवाक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Inspection of aandhalgaon drought situation in just 20 minutes