शहरातील मिळकतधारकांना अपघात विमा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

कोल्हापूर : शहरातील प्रत्येक मिळकतधारक आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी महापालिकेने पाच लाखाचे अपघात विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून याची युनायटेड इन्शुरन्स कंपनीची निविदा स्थायी समितीत मंजूर केली आहे. प्रत्येक मिळकतधारकाचा 75 रुपयांचा वार्षिक हप्ता महापालिकेचा घरफाळा विभाग भरणार आहे. मिळकतधारकांना ही अतिरिक्त सुविधा महापालिकेतर्फे देण्यात येणार आहे. या लोकोपयोगी योजनेचा फायदा शहरातील 1 लाख 43 हजार मिळकतधारकांना होणार आहे. 

जास्तीत जास्त नागरिकांनी घरफाळा भरावा, यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्याच संकल्प स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी गतवर्षी केला होता. याला मूर्त स्वरुप आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. काही महिन्यापासून त्यासाठी विविध माहिती मागविण्यात येत होते. याची निविदाही प्रसिध्द केली होती. निविदांपैकी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची निविदा आज स्थायी समितीत आज मंजूर केली. 

मुलांसाठी कॅशलेस मेडिकल विमा 
महापालिका शाळेतील मुलांची कॅशेलस विमा पॉलिस उतरुन वर्षे 7 ते 15 वयोगटातील 9600 विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू केली जाणार आहे. तसा संकल्पही स्थायी समितीत केला आहे. मिळकतधारकांना अपघात विमा संरक्षणापाठोपाठ या योजनाही लवकरच लागू होण्याच्या हालचाली आहेत. 

कर्मचाऱ्यांसाठीही कॅशलेस विमा 
महापालिका आस्थापनावर चार हजार कर्मचारी आहेत. त्यांच्या वैद्यकीय बिलाच्या परिपुर्तीसाठी शासनाच्या निर्णयानुसार विविध आजाराच्या खर्चाची बिले महापालिकेकडून दिली जातात. यावर दरवषीं एक ते दीड कोटींचा खर्च होतो. त्यात कर्मचारी, त्यांचे आई, वडील, पती, पत्नी, मुले यांचा समावेश आहे. पण सरकारी योजनेत काही त्रुटी असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांसाठीही कॅशलेस विमा योजना लागू केली जाणार आहे. 

शहरातील मिळकतधारकांना जादा सुविधा देण्यासाठी हा संकल्प गतवर्षी केला होता. त्यादुष्टीने वर्षभर वेगवेगळी प्रक्रिया सुरु होती. विविध कंपन्याच्या निविदेतून एका कंपनीची निविदा आज मंजूर केली. आतापासून त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. शहरात घरफाळा विभागाकडे नोंद असणाऱ्या घरफाळा भरणाऱ्या प्रत्येक मिळकतधारक आणि त्याच्या कुटंबातील पाच जणांना त्याचा फायदा होईल. 
- शारंगधर देशमुख , सभापती स्थायी समिती.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insurance for city property holder