खरीप पिकाचे क्षेत्र असलेल्या मंगळवेढ्याला विमा कंपनीने वगळले

हुकूम मुलाणी
बुधवार, 13 जून 2018

मंगळवेढा : खरीप पिकविम्याची रक्कम सात जूनपुर्वी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. खरीप पिक विम्याच्या आशेवर असलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांची विमा कंपनीने भरपाई न देता अन्याय केला. डाळीब पिंक विमा भरपाई देणाऱ्या विमा कंपनीने खरीप पिके वगळून दुजाभाव केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील पिकाची स्थिती अंकात मांडली होती तरीही विमा कंपनीने दुर्लक्ष केले.

मंगळवेढा : खरीप पिकविम्याची रक्कम सात जूनपुर्वी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. खरीप पिक विम्याच्या आशेवर असलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांची विमा कंपनीने भरपाई न देता अन्याय केला. डाळीब पिंक विमा भरपाई देणाऱ्या विमा कंपनीने खरीप पिके वगळून दुजाभाव केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील पिकाची स्थिती अंकात मांडली होती तरीही विमा कंपनीने दुर्लक्ष केले.

शासनाने खरीप पिकविम्यात जाचक अटी ठेवत प्रधानमंत्री फसल बिमा योजना जाहीर केली. यामध्ये शेतकरी व पिकाची माहिती अॅग्री इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळावर भरण्याच्या सुचना दिल्याने शेतकऱ्यांसह बॅकेचे अधिकारी मेटाकुटीला आले. त्यात तालुक्यातील 53748 शेतकऱ्यांनी 360008 हेक्टर क्षेत्राचा 88 कोटी 55 लाख विमा सरंक्षित रक्कम असलेल्या बाजरी, तुर, सुर्यफुल, मका, भुईमूग, उडीद या पिकाच्या सुरक्षेतेपोटी 1 कोटी 77 लाख 46 हजार 854 इतका हप्ता ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीला पाठविण्यात आला होता. पण या कंपनीने तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना वगळून अन्याय केला.

मंगळवेढा  मरवडे 180, भोसे 276, हुलजंती 150, आंधळगाव 156, मारापूर 185, बोराळे 481, मि.मी इतक्या पावसाची नोंद जुन 17 ते सप्टेंबर 17 या कालावधीत नोंदवला गेला. अशातच हात ऊसने पैसे घेवून बाजरी, तूर, सुर्यफूल, मूग, उडीद या पिकांंच्य़ा पेरणी केली. उगवून आलेल्या पिकाला पावसाने शिडकावा केला नसल्यामुळे पिके सुकली. सुकलेल्या पिकाचे होत असलेले हाल बघवत नसल्यामुळे कोल्हापूर व कर्नाटकातून आलेल्या मेंढपाळास त्यांची मेंढरे पिकात सोडून देवून रान मोकळे केले. मुख्यमंत्र्यानी खरीप विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर सात जूनपुर्वी जमा करण्याच्या सुचना दिल्यानंतर त्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची पूर्ण तालुकाच वगळला गेल्याने घोर निराशा झाली. गतवर्षी डाळींब पिकाचा मृगबहारची पाच कोटी नुकसान भरपाई मिळाली असताना याचा हंगामातील खरीप पिके वगळून विमा कंपनीने तालुक्यातील शेतकरी पिकविम्यापासून वंचीत ठेवून अन्याय केला.
 

खरीप पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या मंगळवेढ्याला वगळून विमा कंपनीने फसविले आहे. विमा भरून शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शासनाचा निर्णय  चुकीचा असून हा बदलावा लागेल अनथा शेतकऱ्याला घेवून रस्त्यावर उतरावे लागेल 
- आमदार भारत भालके  

खरीप हंगामातील सुर्यफूलाचे पिक वाया गेले. पिकाचे हाल न बघवल्याने त्यात कोल्हापूरहून आलेली मेंढरे सोडून दिली पिक विमा भरूनही विम्यापासून वंचीत ठेवले.मग नुकसान भरपाई मिळत नसेल तर विमा भरायचा कशाला.  
- नागन्नाथ पाटील शेतकरी

पिक कापणी प्रयोग, चार मंडल मधील पिकाची स्थिती चांगली असल्याचा अहवाल शासनाकडून प्राप्त झाल्याने भरपाई मिळणार नाही.
- बसवराज करपे वरिष्ठ मंडल प्रबंधक ओरीएंटल इन्सुरन्स कंपनी

Web Title: The insurance company has excluded the area of kharif crops