जागतिक टपाल दिनानिमित्त पोस्टमनशी साधलेला संवाद

जयभिम कांबळे
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

तळमावले (सातारा) - आज जागतिक टपाल दिन.. ब्रिटीश काळापासून चालत आलेले टपालखाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोहचलेले आहे. आजच्या एस.एम.एस, वॉट्सप, ई-मेलच्या जमान्यात त्यांच्या तोडीस तोड टपाल यंत्रणा आजही पाय रोवून उभी आहे. टपाल खाते हे भारतातील एक प्रामणिक व भ्रष्टाचार मुक्त खाते आहे असा नामोल्लेख नेहमीच केला जातो. टपाल खात्याची नियमितता, कार्यशैली, अचूकता, कार्यप्रणाली ही बिनचूक व विश्वासार्य़ आहे. यात लोकांच्या मनात कोणतीच शंका नाही. टपाल म्हंटले की आपल्या समोर उभा राहतो तो आपल्या गावचा पोस्टमन..

तळमावले (सातारा) - आज जागतिक टपाल दिन.. ब्रिटीश काळापासून चालत आलेले टपालखाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोहचलेले आहे. आजच्या एस.एम.एस, वॉट्सप, ई-मेलच्या जमान्यात त्यांच्या तोडीस तोड टपाल यंत्रणा आजही पाय रोवून उभी आहे. टपाल खाते हे भारतातील एक प्रामणिक व भ्रष्टाचार मुक्त खाते आहे असा नामोल्लेख नेहमीच केला जातो. टपाल खात्याची नियमितता, कार्यशैली, अचूकता, कार्यप्रणाली ही बिनचूक व विश्वासार्य़ आहे. यात लोकांच्या मनात कोणतीच शंका नाही. टपाल म्हंटले की आपल्या समोर उभा राहतो तो आपल्या गावचा पोस्टमन.. उन्हाळा पावसाची तमा न बाळगता आपल्याला आपल्या प्रियजनांनी पाठवलेले साधे पत्र असो वा स्पिड, रजिस्टर वा पार्सल आपल्या घरापर्यंत येऊन प्रमाणिकपणे पोहचवतो असा पोस्टमन दादा....अशाच एका पोस्टमन दादाची मुलाखात दैनिक सकाळने घेऊन पोस्टमनच्या कामाची व त्याला येणाऱ्या अडी-अडचणीची व्यथा आज त्याच्या तोंडातून मांडत आहे. 

तळमावले गावात गेली ३३ वर्षे पोस्टमनचे काम करून आपली ड्यूटी बजावणारे पोस्टमन दादा श्री संजय शंकर कांबळे हे गावातील प्रत्येक लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत. आज ते कराड प्रधान डाकघरात एका चांगल्या पदावर ड्युटी बजावत आहेत. त्यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगीतले की, टपाल खाते हे ग्रामीण भागातील संपर्काचे एक महत्वाचे साधन आहे. लोकांची आलेली पत्रे व द्यावयाची पत्रे लोकांना सुखरूप घरपोच पोहचवणे हे पोस्टमनचे काम असते. मी ज्यावेळी पोस्टात कामाला लागलो त्यावेळी मला फक्त १५० रू पगार होता. या पगारातून मी माझा घरखर्च भागवत होतो. हे काम करत असताना पावसाळ्यात मला खात्याकडून छत्री, गमबूट मिळायचे त्यामुळे पावसाळ्या माला पत्र वाटायचे काम सुलभ व्हायचे. आज कामाचा बोजा जास्त असला तरी आपण एक राष्ट्रहिताचे काम करतोय य़ाचीही जाणीव त्यावेळी होती अन आजही आहे. 

हळूहळू पगार वाढत गेला अन कामही.. लोकांची पत्रे त्यांच्या घरपोच पोहचवणे हे मुख्य काम पोस्टमनचे असते ते मी प्रामाणिकपणे करत राहिलो. आज या टपाल दिनाच्या निमित्ताने मी एवढेच सांगतो की, कोणतेही काम करा पण ते प्रामाणिकपणाणे करा. आपल्या कामातून समाजाला व त्याबरोबरोबर आपल्या राष्ट्राचा फायद झाला पाहिजे.

पोस्टमनच्या या रोजच्या कामाचे व एकंदरीत टपाल खात्यातील टपाल वितरणाचे हे काम कसे अविरत चालू असते हे आपल्याला दिसून येत आहेत. टपाल खात्याकडून आपल्याला अशाच प्रकार चांगली सेवा मिळावी अशी अपेक्षा ठेवणे साहजिकच आहे.

Web Title: international post day special