आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषदेसाठी देश विदेशातून व्यापारी इचलकरंजीत

संजय खूळ
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

इचलकरंजी - प्रिंटेड, निटेड फॅब्रीक, गणवेशासाठी लागणाऱ्या कापडासह शर्टींग आणि शुटींग कापडाला मोठी मागणी आहे. पॉवरलूम डेव्हलपमेंट एक्‍स्पोर्ट प्रमोशन कौन्सीलच्यावतीने (पीडीएक्‍सएल) येथे आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषद सुरू असून या ठिकाणी देश विदेशातील अनेक व्यापारी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून प्रामुख्याने या प्रकारच्या कापडाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

इचलकरंजी - प्रिंटेड, निटेड फॅब्रीक, गणवेशासाठी लागणाऱ्या कापडासह शर्टींग आणि शुटींग कापडाला मोठी मागणी आहे. पॉवरलूम डेव्हलपमेंट एक्‍स्पोर्ट प्रमोशन कौन्सीलच्यावतीने (पीडीएक्‍सएल) येथे आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषद सुरू असून या ठिकाणी देश विदेशातील अनेक व्यापारी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून प्रामुख्याने या प्रकारच्या कापडाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

पीडीएक्‍सएलच्या वतीने देशातील कापडाचे मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावी यासाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. देशात तयार होणाऱ्या कापडाचे परदेशात जिथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्या देशांना या प्रदर्शनासाठी विशेष निमंत्रित केले जाते. तेथील शासनाच्यावतीने उद्योजकांची निवड करून या प्रदर्शनासाठी पाठविले जाते. 13 देशातील 65 उद्योजक या ठिकाणी दाखल झाले असून त्यांच्याबरोबरच देशातील अनेक शहरातील कापड व्यापारीही या ठिकाणी आले आहेत. शर्टींग, सुटींग, प्रिंटेड फॅब्रीक, हॅंकर चीप, युनिफॉर्म, निटेड फॅब्रीक, कॅनव्हास, चिटींग फॅब्रीक, टर्किस टॉवेल अशा देशात उत्पादीत होणाऱ्या कापडाला विविध देशातील उद्योजकांकडून मागणी आहे.

या प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर म्हणून डीकेटीई संस्था काम करीत आहे. परदेशातील ग्राहकांची मागणी आणि त्यांच्या मागणीप्रमाणे देशात उत्पादन करणाऱ्या उत्पादकांची भेट घालून देण्याचे काम ही संस्था करीत आहे. यातून चांगल्या पध्दतीने निर्यातीला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात इचलकरंजी आणि परिसरातीलही कापड उत्पादक सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात हजारो प्रकारच्या कापडाचे सॅंपल फोल्डर स्वरूपात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर येथील उत्पादन होणारा माल पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास अशा परदेशी पाहुण्यांना थेट उत्पादन केंद्राच्या ठिकाणी नेण्यात येत आहे.

निर्यातीला मोठी संधी

यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या प्रदर्शनावेळी निर्यातीला मोठी संधी मिळाली होती. पीडीएक्‍सएलकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदर्शनाच्या माध्यमातून वर्षाला 24 हजार कोटीची वाढ झाली होती. यावेळी ही वाढ त्यापेक्षाही अधिक अपेक्षीत आहे.

भारतात तयार होणारे अनेक कापड उत्पादन गुणवत्तापूर्ण आहेत. आमच्या देशात या ठिकाणी तयार होणाऱ्या कापडाला नक्कीच मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळेल असा विश्‍वास आहे.
- सोमसाक जाम बुजींग, 

थायलंड
 

Web Title: International Powerloom conference