ग्रामीण भागात साकारतेय आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान, कुठे?

संजय गणेशकर
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पलूस येथील भारती विद्यापिठाच्या आवारात भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या संकल्पतेतून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय मैदानाची उभारणी करण्यात येत असून, मैदानाचे काम अंतीम टप्प्यात आहे. ग्रामीण भागातील हे पहिलेच क्रिकेट मैदान आहे. 

पलूस : पलूस येथील भारती विद्यापिठाच्या आवारात भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या संकल्पतेतून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय मैदानाची उभारणी करण्यात येत असून, मैदानाचे काम अंतीम टप्प्यात आहे. ग्रामीण भागातील हे पहिलेच क्रिकेट मैदान आहे.

मुंबई, पुणे नंतर महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात पलूस सारख्या ग्रामीण भागात हे मैदान होत आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या संकल्पनेतून है मैदान उभा रहात आहे. फक्त मैदानच नाही, तर याठिकाणी नवोदित क्रिकेट खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व ते शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापिठाची स्थापना केली. पलूस येथे पॉंलिटेक्‍निक कॉंलेज आणि कन्या शाळा सुरू केली. येथील भारती विद्यापीठाच्या मैदानावरच आता क्रिकेट मैदान उभारले जात आहे.

Image may contain: 3 people, people standing

सद्या या क्रिकेट मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकूण 70 यार्ड हिरवळ (टफ) असणारे हे मैदान आहे. हे मैदान उभारत असताना डॉ. विश्वजित कदम यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, प्रशिक्षक, तज्ञ यांचे मार्गदर्शन घेतले आहे. क्रिकेटविर सचिन तेंडुलकर यांचीही डॉ. कदम यांनी भेट घेऊन पलूस येथील क्रिकेट मैदानाबाबत माहिती दिली. 

ग्रामीण भागातील पहिले क्रिकेट मैदान

स्व. आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागातील गरजू मुलामुलींची भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची सोय केली. पलूस येथेही शैक्षणिक संकुल उभारले. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना क्रिकेटचं प्रशिक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी सोयी, सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. म्हणून पलूस येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारले पाहिजे. अशी संकल्पना होती. ती आता सत्यात उतरत आहे. पलूस येथील भारती विद्यापीठ आवारात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान पूर्णत्वास येत आहे. ग्रामीण भागातील हे पहिले क्रिकेट मैदान आहे. याठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मार्गदर्शन करतील. मैदानाचे काम लवकरच पूर्ण होईल. 
- डॉ. विश्वजित कदम, 
कार्यवाह, भारती विद्यापीठ, पुणे. सहकार व कृषी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. 

क्रिकेट मैदानाची वैशिष्ट्ये 

  • खेळपट्टी 5 विकेट आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार. 
  • प्रॅंक्‍टीस विकेट 3 . पैकी 1 सिमेंट व 2 टर्फ विकेट. 
  • महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी लागणारी ' अ ' दर्जाची खेळपट्टी. 
  • एकूण 70 यार्ड ची संपूर्ण टर्फ बॉंड्री. 
  • विद्युत प्रकाश झोतात क्रिकेट सामने खेळण्याची सोय. 
  • मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंचे मार्गदर्शन. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International standard cricket ground is being built in Sangli