जरूर वाचा! तुम्हालाही आठवेल चहाच्या टपरीवरील चर्चा 

अशोक मुरुमकर
सोमवार, 16 डिसेंबर 2019

स्मार्टफोनच्या जमान्यात संवाद कमी झाला आहे. मात्र, आजही शहर असो की ग्रामीण भागातील चहाच्या टपरीवर (कॅन्टीन) गप्पांचे फड रंगताना दिसत आहेत. नोकरीच्या ठिकाणासोबतच घरी कितीही धावपळ असली तरीही चहा पिताना मेजवानी असते ती गप्पांचीच! सध्या तर देशात गप्पांसाठी विषयांची कमी नाही. प्रेमप्रकरण असो की खून, मारामाऱ्या अथवा राजकीय, गप्पांचा फड रंगतो.

सोलापूर : स्मार्टफोनच्या जमान्यात संवाद कमी झाला आहे. मात्र, आजही शहर असो की ग्रामीण भागातील चहाच्या टपरीवर (कॅन्टीन) गप्पांचे फड रंगताना दिसत आहेत. नोकरीच्या ठिकाणासोबतच घरी कितीही धावपळ असली तरीही चहा पिताना मेजवानी असते ती गप्पांचीच! सध्या तर देशात गप्पांसाठी विषयांची कमी नाही. प्रेमप्रकरण असो की खून, मारामाऱ्या अथवा राजकीय, गप्पांचा फड रंगतो. तो चहाच्या कॅन्टीनवरच. खेड्यातील असो की आंतरराष्ट्रीय, येथे होतो सर्वच विषयांचा उलगडा. अनेकांच्या मनातली गुपितं सांगण्याचे ठिकाण म्हणजेच चाय पे चर्चा. 15 डिसेंबर हा जागतिक चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने शहरातील काही नामवंत चहाच्या टपऱ्यांवर नेमक्‍या काय गप्पा रंगताहेत, हे पाहिले तेव्हा वेगवेगळे किस्से समोर आले. 

Image may contain: 2 people, people sitting, table and outdoor

हेही वाचा : इथे प्या, एक रुपयात एक घोट चहा (व्हिडिओ) 
चहावाला पंतप्रधान 

सोमवारी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रविवारी राज्य सरकारने चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार टाकला. मात्र चहा विकणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याने या देशात चहावाला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो, हे भाजप मोठ्या अभिमानाने सांगत होता. आणि याच चहा दिवशी भाजपने राज्यातील चहापानाच्या कार्यक्रमावर कसा काय बहिष्कार टाकला, याची चर्चा केली जात होती. 
अडगळीत पडलेला चहा मोदी पंतप्रधान झाल्यापासून चांगलाच चर्चेत आला. अनेक व्यावसायिकांनी मोठमोठ्या शहरांमध्ये चहाचा व्यवसाय वाढवला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा राहून तासन्‌तास गप्पा मारणाऱ्यांना चांगलीच संधी उपलब्ध झाली आहे. 

हेही वाचा : पेयांचा राजा... "चहा'चा इतिहास... 
अशी रंगते चर्चा 

बांधकाम कामगार यजगल खोमळ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे वाळूचा प्रश्‍न सोडवावा. राज्यात काही वर्षांपासून वाळू उपसा बंद आहे. त्याचा रोजगारावर परिणाम होत आहे. बांधकाम व्यवसाय सध्या तोट्यात आहे. 
विद्यार्थी शिवा चिन्नापागा म्हणाला, सध्या देशात महागाई मोठ्या प्रमाणात आहे. शैक्षणिक शुल्क जास्त असल्याने इच्छा असूनसुद्धा हवं त्या महाविद्यालयात शिक्षण घेता येत नाही. नागेश चिन्नापागा म्हणाला, परिस्थितीमुळे मला शिक्षण करता आले नाही. मात्र सुरवातीपासून चहा विकत असल्याने दुसरं काही करता आले नाही. आताही मी हॉटेल व्यवसायातच आहे. 

हेही वाचा : "तांबडा- पांढरा' तापला, शिककडाई नरमली 
आमची व्यथा 

बालाजी मंदापुरे हे एका ठिकाणी नोकरी करत आहेत. ते म्हणाले, सरकारने आमचा बोनस बंद केला आहे. पगारही वेळेवर होत नाही. रोजगार मिळायला हवेत. मंदीमुळे कामगार कपात केली जात आहे. चहा विकून पंतप्रधान झालेल्या मोदींनी किमान कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड येणार नाही याची काळजी घ्यावी. श्रीनिवास बेरकल्लु म्हणाले, रोजगार मिळायला हवेत. परिस्थितीमुळे शिक्षण नाही. सरकारने सुविधा द्याव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Tea Day Discussion on various topics in Solapur