मोहोळ मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 21 जून 2018

मानवाला जगण्यासाठी जशी आहाराची आवश्यकता असते. तसेच, सुंदर व निरोगी शरीरासाठी आसन प्राणायमाची निंतात आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी जागतीक योगदिनाच्या निमीत्ताने आयोजीत योगशिबिरात केले. अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख होते. पतंजली योग समिती मोहोळ यांनी आयोजीत केलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

मोहोळ(सोलापूर)- मानवाला जगण्यासाठी जशी आहाराची आवश्यकता असते. तसेच, सुंदर व निरोगी शरीरासाठी आसन प्राणायमाची निंतात आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी जागतीक योगदिनाच्या निमीत्ताने आयोजीत योगशिबिरात केले. अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख होते. पतंजली योग समिती मोहोळ यांनी आयोजीत केलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, माजी सरपंच व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, भाजपाचे संजय क्षिरसागर, सोमेश क्षिरसागर, डॉ. वसीम शेख, अॅड. कैलास नाईक , इंजिनियर मिलींद अष्टुळ, संतोष शेंडे, नाना डोके, प्राचार्य बशीर बागवान, सौ. संगीता फाटे, राजशेखर घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पंतजली योग समितीच्या महिला तालुका प्रभारी अरूणा घोंगडे, योग शिक्षक व सकाळचे शहर प्रतिनिधी प्रा. चंद्रकांत देवकते, वैशाली वसेकर आदीनी उपस्थित योगसाधकांना योगाची माहीती सांगत, प्राणायम, आसने, सुर्यनमस्कार आदीच्या प्रात्यक्षिकाद्वारे त्यांच्याकडुन हे सर्व प्रकार करून घेतले.

Web Title: International yoga Day celebrate in Mohol