बार्शी तालुक्‍यात इंटरनेट सेवा खंडित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

बार्शी - बार्शी शहरात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी साडे सहापासूनच इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. आज सकाळी 11 ते सांयकाळी पाचपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले.

वीस दिवसांत दुसऱ्यांदा बार्शी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदवेळी एसटी वाहतूक पूर्णपणे बंद होती. बार्शी बस स्थानकात बुधवारी रात्रीपासून बस गाड्या लावण्यात आल्या होत्या. बसबरोबरच खासगी वाहतूकही बंद असल्याने व राज्यात सर्वत्रच बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. बंदवेळी शहरातील अमर लंच होम यांनी सर्व पोलिस, राज्य राखीव दलातील पोलिस व होमगार्ड यांना दुपारचे जेवण व पिण्याचे पाणी देऊन सहकार्य केले.

Web Title: Internet service close in barshi