माहिती असू द्या...मंकी हिल-कर्जत मार्गावर अडथळा...या रेल्वे रद्द 

Indian_Railway
Indian_Railway

सोलापूर : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मंकी हिल- कर्जत स्थानकादरम्यानचा अडथळा मागील महिनाभरापासून दूर झालेला नाही. त्याठिकाणच्या तांत्रिक कामामुळे 30 जानेवारीपर्यंत मुंबई- पंढरपूर फास्ट पॅसेंजर, पंढरपूर- मुंबई पॅसेंजर, मुंबई- विजयपूर व विजयपूर- मुंबई फास्ट पॅसेंजर, दौण्ड-साईनगर व साईनगर- दौण्ड रद्द करण्यात आल्या आहेत. तर भुसावळ- पुणे- भुसावळ एक्‍स्प्रेसला मनमाड, दौण्डमार्गे परावर्तीत करण्यात आले आहे. 


मंकी हिल- कर्जत स्थानकावर अप लाईनवर तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. रुळाची दुरुस्ती सुरु असून मागील 25 दिवसांपासून सातत्याने या मार्गावरील वाहतुकीत रेल्वे प्रशासनाला बदल करावा लागला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. तत्पूर्वी, रेल्वे गाड्या रद्दचा निर्णय 20 जानेवारीपर्यंत घेण्यात आला होता. मात्र, अद्याप काम पूर्ण न झाल्याने त्यास पुन्हा 20 ते 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ घेण्यात आली आहे. 21 जानेवारीपासून हा बदल केला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. 


पनवेल- नांदेड एक्‍स्प्रेस आता नियमित धावणार 
दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीमुळे पनवेल- नांदेड एक्‍स्प्रेस नियमित करावी, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. तत्पूर्वी, ही रेल्वे गाडी आठवड्यातून सहा दिवस धावत होती. 1 फेब्रुवारीपासून नांदेड- पनवेल एक्‍स्प्रेस शनिवार वगळता नियमित धावणार आहे. तर पनवेल- नांदेड एक्‍स्प्रेस 2 फेब्रुवारीपासून रविवार वगळता नियमित धावणार आहे. 


गुंटकल विभागातील नालवार स्थानकावर गाड्यांना थांबा 
श्री कोरिसिध्देश्‍वर महासंस्थान मठ, नालवार यांच्या जत्रा महोत्सवानिमित्त येणाऱ्या यात्रेकरुंची सोय व्हावी या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने नालवार स्टेशनवर रेल्वे गाड्यांना एक मिनिटांचा थांबा दिला आहे. त्यामध्ये एलटीटी- कोईमतूर, कोईमतूर- एलटीटी, दादर- चेन्नई इग्मोर, चेन्नई इग्मोर- दादर, मुंबई- नागरकोईल, नागरकोईल- मुंबई व नागरकोईल- मुंबई एक्‍स्प्रेसचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com