६५ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

राजेंद्र पाटील
सोमवार, 24 एप्रिल 2017

कोल्हापूर -जिल्हा परिषदेच्या शाळांतील ६५ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत. यामध्ये फक्त नाशिक जिल्ह्यातच ६१ शिक्षक बदलीने जात असून हे सर्व एस.टी. प्रवर्गातील आहेत. येत्या चार दिवसांत त्यांना बदलीचे आदेश दिले जाणार असून ८ मे रोजी त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. मात्र आंतरजिल्हा बदलीने कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या सुमारे ७०० शिक्षकांच्या बदलीचा निर्णय अद्याप अधांतरीच आहे. याबाबत निश्‍चित निर्णय झालेला नाही. 

राज्यात हजारो शिक्षक अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. शेकडो-हजारो किलोमीटर अंतरावर शिक्षक काम करत आहेत. स्वतःच्या जिल्ह्यात बदलीने येण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू आहे. राज्याच्या एका टोकाला पती तर दुसऱ्या टोकाला पत्नी सेवेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत शासनाने अद्याप कोणतेही ठोस धोरण ठरविलेले नाही. राज्यस्तरावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले जाणार आहेत; मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही. 

सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेने व बदलीने जाण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेने दिनांक ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. अशा शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन्ही जिल्हा परिषदांचे ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या ६५ शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार आहे. त्यामध्ये नाशिक जिल्हा ६३, लातूर व सातारा प्रत्येकी एक अशा ६५ जणांचा समावेश आहे. बदली होणारे बहुतांश शिक्षक हे शाहूवाडी, चंदगड आदी तालुक्‍यांत कार्यरत आहेत. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे ३६० शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात बदलीने जाण्यास इच्छुक आहेत, तर इतर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात बदलीने येणाऱ्या शिक्षकांची संख्या सुमारे ७००  इतकी आहे.

दोन्ही जिल्हा परिषदांचे ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांच्या बदल्या होत आहेत. उर्वरित आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांबाबत अद्याप शासन निर्णय झालेला नाही. शासन आदेश येताच बदली प्रक्रिया सुरू केली जाईल.
- सुभाष चौगले, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: Interstate transfers of 65 teachers