कुलसचिवपदासाठी आज मुलाखत प्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील कुलसचिवपदासाठी उद्या (ता. 15) मुलाखत प्रक्रिया होत आहे. प्रलंबित प्रश्‍नांची जाणीव ठेवून सतरा उमेदवारांना मुलाखत प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. मुख्य इमारतीतील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात सकाळी नऊ वाजता मुलाखत प्रक्रियेस सुरवात होईल. 

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील कुलसचिवपदासाठी उद्या (ता. 15) मुलाखत प्रक्रिया होत आहे. प्रलंबित प्रश्‍नांची जाणीव ठेवून सतरा उमेदवारांना मुलाखत प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. मुख्य इमारतीतील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात सकाळी नऊ वाजता मुलाखत प्रक्रियेस सुरवात होईल. 

विद्यापीठातील प्राध्यापकांचा पदोन्नतीचा प्रश्‍न अद्याप निकालात निघालेला नाही. निवृत्त प्राध्यापकांचा निवृत्तिवेतनाचा प्रश्‍नही जैसे थे आहे. निवृत्त होऊन अडीच वर्षे झाली तरी त्यांना निवृत्तिवेतन मिळालेले नाही. प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा प्रश्‍नही कायम आहे. हे प्रश्‍न सुटावेत, अशी अपेक्षा सुप्टाचे सचिव डॉ. एन. बी. गायकवाड यांची आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न तडीस लागावेत, यासाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघ व शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघटना आग्रही आहे. विद्यापीठ प्रश्‍नांची जाण असणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील व्यक्तीची पदावर निवड व्हावी, असे काही घटकांचे म्हणणे आहे. काही मात्र विद्यापीठाला पुढे नेणारा कुलसचिव मिळावा, अशी चर्चा करत आहेत. राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे आनंद खामकर यांच्या म्हणण्यानुसार कुलसचिव हा सर्व घटकांच्या हक्कांची काळजी घेणारा असायला हवा. त्याने नियमानुसार विद्यापीठाचा कारभार करावा व विद्यापीठाची बदनामी होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घ्यावी. त्यामुळे उद्या उमेदवारांना विद्यापीठातील विविध घटकांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. 

उमेदवार असे 
प्रा. भारत पाटील (कडेगाव कॉलेज, कऱ्हाड), डॉ. संजयकुमार गायकवाड (झील एज्युकेशन सोसायटी झील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर ऍप्लिकेशन), विलास नांदवडेकर (संचालक, सिंहगड इन्स्टिट्यूट), डॉ. मिलिंद गोडबोले (प्राचार्य, आयुर्वेदिक कॉलेज), डॉ. जी. बी. कोळेकर (शिवाजी विद्यापीठ), राजूसिंग चव्हाण (गुजरात कॉमर्स अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट), सयाजीराजे मोकाशी (प्राचार्य, खटाव कॉलेज), भारतभूषण (संचालक, यशदा), धनंजय माने (प्रशासकीय अधिकारी, कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालय), जयंत देशमुख (जालना), सुनील मिरंगे (जे. ई. एस. कॉलेज), डॉ. संजय माळी (प्राचार्य, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे आर्टस अँड शांतीदेवी गुप्ता कॉर्मस, सायन्स कॉलेज), डॉ. शरद फुलारी (प्राचार्य, अलिबाग कॉलेज), डॉ. यशवंत कोळेकर (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग), डॉ. पंढरीनाथ पवार (चंपाबेन शहा महिला महाविद्यालय), सर्जेराव शिंदे (प्राचार्य, देशमुख महाविद्यालय, नांदेड), किशोर माने. 

Web Title: The interview for the position of registrar