एक वर्षासाठी मी सभापती : प्रा. बंडगर

अण्णा काळे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

करमाळा (सोलापूर) : पंचवीस वर्ष आमदार नारायण पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून पाटील गटाची उभारणी करणाऱ्या प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी अनपेक्षित पणे बंडाचा झेंडा हाती घेत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची खुर्ची हस्तगत केली, नेमक्या आशा काय घडामोडी घडल्या? बागल गटाने नेमकी काय जादू केली? की, 25 वर्षाच्या पाटील गटाच्या विश्वासाला तडा देऊन प्रा. 'बंड'गरांनी हा निर्णय घातला का घेतला? प्रा.बंडगरांचा बोलविता धनी वेगळा असल्याची चर्चा आहे, मात्र आपला बोलवीता धनी कोणी नाही तर हा निर्णय आपला वैयक्तिक असुन पुढील एक वर्षासाठी मी सभापती असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

करमाळा (सोलापूर) : पंचवीस वर्ष आमदार नारायण पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून पाटील गटाची उभारणी करणाऱ्या प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी अनपेक्षित पणे बंडाचा झेंडा हाती घेत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची खुर्ची हस्तगत केली, नेमक्या आशा काय घडामोडी घडल्या? बागल गटाने नेमकी काय जादू केली? की, 25 वर्षाच्या पाटील गटाच्या विश्वासाला तडा देऊन प्रा. 'बंड'गरांनी हा निर्णय घातला का घेतला? प्रा.बंडगरांचा बोलविता धनी वेगळा असल्याची चर्चा आहे, मात्र आपला बोलवीता धनी कोणी नाही तर हा निर्णय आपला वैयक्तिक असुन पुढील एक वर्षासाठी मी सभापती असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. बाजार समिती सभापती पदाच्या घडलेल्या घडामोडी विषयी बाजार समितीचे नुतन सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांच्याशी केलेली बातचीत -

प्रश्न : आपण आमदार नारायण पाटील गटाचे निष्ठावंत,विश्वासु सहकारी म्हणून आपली ओळख असताना आपण बागल गटात प्रवेश केला
- नारायणआबा पाटील यांना आमदार करायचं व त्यांचा गट वाढवायचा म्हणून रात्रीचा दिवस करणारा मी कार्यकर्ता आहे, गट वाढीसाठी सहका-यांना बरोबर घेऊन अकलूजला नोकरी सांभाळून काम केले आहे. नारायणआबा साठी काम करत असताना मी उजनी धरणग्रस्तांची चळवळ, शिक्षकांची चळवळ ,करमाळा तालुका सरपंच संघटना, धनगर समाजाची चळवळ , सोलापूर विद्यापीठ नामांतर ,ढोकरी गावचा विकास अशा प्रश्नांवर झोकून देऊन सक्रिय राहून गट वाढवत राहिलो.या सगळ्यात महत्वाचे म्हणजे नारायण आबा पाटील याना मोठ करण्यासाठी सतत संघर्ष चालू ठेवला. त्यांना सभापती करण्यापासून आमदार करण्या पर्यंत सावली सारखा उभा राहिलो. सत्तावीस वर्षे मी करमाळा तालुक्याच्या समाजकारण व राजकारण यात सामान्य माणूस केंद्रीत करून काम करतोय.मार्केट कमिटी च्या निवडणुकीत बागल गटाची सभापतीची ऑफर मला योग्य वाटली. तालुक्यातील एका महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी सोडू नये असे वाटल्याने वेदना होत असतानाही कठोर होवून निर्णय घेतला.यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असल्याची मला जाणीव आहे त्यांची माफी मागतो.

प्रश्न : आपला बोलविता धनी वेगळाच असल्याची चर्चा आहे? याबाबत आमदार नारायण , मोहीते पाटील यांच्याकडे बोट केले जातेय? 
- आपला बोलविता धनी मोहिते पाटील अगर आमदार नारायणआबा पाटील आजिबात नाहीत.उगीच कुणाला ही आरोपी च्या पिंजर्यात उभे करणे चुकीचे आहे.आपण आमदार पाटील यांना आगोदरपासुन सांगत होतो आमदार पाटील व जगताप युतीचा सभापती पदाचा उमेदवार जयंतराव जगताप असतील तर ठरल्याप्रमाणे जयवंतराव जगताप यांना सभापती करण्यास मी बांधील आहे. पण मला मिळालेल्या माहितीनुसार जगताप यांच्याऐवजी दुसरेच कुणीतरी सभापती होणार आहे यांची खाञी पटली .मी आबांना सांगितले ,आबा तुम्हाला मिसगाईड केल जातंय.पण पाटील यांनी माझे ऐकले नाही ते म्हणाले तसे काही होणार नाही,आपल्याला जयवंतराव जगतापांनाच सहकार्य करायचे आहे,तुम्ही दुसरा काही विचार करायचा नाही.जगतापानाच मतदान करा. शेवटी मी म्हणत होतो तसेच झाले. मला मिळालेल्या माहिती प्रमाणे जयंवतराव जगताप यांचे ऐवजी चंद्रकांत सरडे सभापती पदासाठी उमेदवार होते. त्यामुळे मी स्वतः अर्ज भरला . माझी सभापती होण्याची तीव्र इच्छा होती,महत्तवकांक्षा होती, त्यामुळे मी स्वतःच हा निर्णय घेतला आहे. 

प्रश्न : या घडामोडी अर्थिक देवाण -घेवाण झाल्याची चर्चा आहे हे खरे आहे का?
- अजिबात नाही मी चळवळीतील कार्यकर्ता आहे, मी विकणा-या मधला नाही, सभापती पद देण्याऐवजी बाकी कोणतेही आश्वासण मला दिलेले नाही.
बागल पार्टीचे समर्थन मला मिळाले.त्यासाठी त्यांनी बागल गटात प्रवेश करण्याची अट घातली ,मी बागल गटात प्रवेश केला आहे. बागल गटाने मला एक वर्ष सभापती चा शब्द दिलेला आहे. बागल पार्टी कडून एक रुपया देखील मी घेतलेला नाही,घेणार नाही. मात्र तालुक्यातील महत्त्वाच्या पदावर काम करून त्या पदाला साजेल असा कारभार करून नावलौकिक मिळवावा ही महत्त्वांकांक्षा होती.

प्रश्न: बागल गटाने काय आश्वासने दिली?कोणी बोलणी घडवुन आणली
- अशा प्रसंगी नेमके कोणाचे नाव घेणे उचीत होणार नाही, माझे मिञ सर्व गटात आहेत. तसे बागल गटातही अनेक मित्र आहेत. अनेकजण मला बोलत होते. पण जयवंतराव जगताप यांना सभापती करण्याचा शब्द आमदार पाटील यानी दिला होता. तो पूर्ण करण्यासाठी बागल गटातील मित्रांना मी नकार देत होतो. दरम्यान बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, मकाई अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्याशी अधुन मधुन बोलणे होत होते. त्यांनी मला सभापती करण्याचे आश्वासन दिले त्याप्रमाणे पुढील घडामोडी घडल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: interview of shivaji bandgar