सोलापूरच्या तरुणाईचा येतोय "तुझ्या मागं येड्यावानी'' अल्बम 

सोलापूरच्या तरुणाईचा येतोय "तुझ्या मागं येड्यावानी'' अल्बम 

सोलापूर : सोलापूरचे युवा गीतकार, अभिनेता मनोज टोणपे यांच्या "परी म्हणू की सुंदरा, जणू उतरली अप्सरा..., बघता मी तुला हरपलं भान, रातभर उरात या उठलं तुफान...' या शब्दांना उत्साह निर्माण करणाऱ्या गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजाची जोड मिळाली आणि तयार झालाय "तुझ्या मागं येड्यावानी' हा गावरान मराठी अल्बम. गाण्याच्या टिझरने यूट्यूबवर चांगलाच धुमाकूळ घातला असून येत्या 23 ऑक्‍टोबरला हा अल्बम प्रदर्शित होत आहे. 

"परी म्हणू की सुंदरा, जणू उतरली अप्सरा..., बघता मी तुला हरपलं भान, रातभर उरात या उठलं तुफान..., तुझ्यामागं फिरतोय नट्टापट्टा करतोय, झाली तू जिंदगी तुझ्या झुरतोय..., झोप झाली वैरी, ना भूक ना तहान, घेऊन काळजात पिरतीच उधाण..., व्हश्‍शील राणी कधी पडतया सपान, बघ कसा धावतोया, बघ कसा धावतोया..., बघ कसा धावतोया, तुझ्या मागं येड्यावानी...' असे या अल्बमचे शब्द आहेत. सरस्वतीचंद्र ग्रुप प्रस्तुत तुझ्या मागं येड्यावानी या मराठी म्युझिक अल्बमच्या टिझरने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. अल्बमचे दिग्दर्शन सनी खेरवाल यांचे असून निर्माता सुधीर टोणपे हे आहेत. गीतकार व अभिनेता म्हणून सोलापूरच्या मनोज टोणपे यांची चांगलीच हवा होत आहे. त्यांच्यासोबत अल्बमचे ज्ञानेश्‍वरी कोऱ्हाळे, ईश्‍वरी माळवदकर, सचिन बिराजदार, राहुल चवरे यांच्याही भूमिका लक्षात राहण्यासारख्या आहेत. वरुण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. 23 ऑक्‍टोबर रोजी यूट्यूबवर हे गाणं प्रदर्शित करण्यात येणार आहे. अल्बमचे चित्रीकरण सोलापूरसह परिसरातील टाकळी, बुरुर, हत्तरसंग कुडल याठिकाणी चार दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. सोलापूरसह पुणे, कोल्हापूर, अमरावती, मुंबई, नाशिक आणि नांदेडमधील तरुण-तरुणींच्या यात भूमिका आहेत. 

यूट्यूबवर आणि टीव्ही अल्बमला जास्त मागणी आहे. यापूर्वी आमच्या "पोरी तुझा नखरा..' या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गायक आदर्श शिंदे यांनी गाणे गायले आहे. तुझ्या मागं येड्यावानी या अल्बमचे सोलापूर परिसरात चित्रीकरण झाले आहे. 
- मनोज टोणपे, गीतकार, अभिनेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com