माचणूर : प्रतीक शिवशरण हत्येप्रकरणी अजूनही तपास सुरूच

machnur
machnur

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील माचणुरच्या प्रतीकचे अपहरण करून केलेल्या त्याच्या हत्येला 14 दिवसांचा अवधी उलटूनही अद्याप पोलिसांना मारेकरी सापडले नाहीत. तपास यंत्रणा वेगाने काम करत असताना या मतदारसंघाचे खा. शरद बनसोडे माजी खा. सुशीलकुमार शिंदे यांनी कुटुंबाचे सांत्वनही केले नाही, तसेच तपासाचा आढावाही घेतला नाही. याबाबत तालुक्यातील या समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अपहरण झालेल्या दुसऱ्या दिवशी आमदार भारत भालके यांनी भेट दिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. प्रशांत परिचारक, लक्ष्मण ढोबळे, राजाभाऊ सरवदे, यांनीही भेट दिली. जनहीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख आपल्या संघटनेसमवेत विभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मारेकऱ्याची अटक करा, तपासात दिरंगाई करणार्‍यावर कारवाई, प्रतिकचा गायब केलेला पाय आदी मागण्यासाठी ऐन दिवाळीत आंदोलनास बसले.

नदीकाठचा सधन असलेल्या माचणूर, ब्रम्हपुरी, बेगमपूर या परीसरातील दिवाळी सणावर प्रतिकच्या घटनेने संक्रात आली. प्रत्येकाला उत्सुकता आहे. ती मारेकरी कधी सापडतात. याच मारेकऱ्याला शोधासाठी पोलिस अधिकारी व तपास यंत्रणेसह माचणूर मुक्कामी ठाण मांडून आहेत.

या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली  या घटनेबाबत पण याच समाजातील खा. शरद बनसोडे  व माजी मंत्री राहिलेले  सुशील कुमार शिंदे  यांचे अलीकडच्या काळात कार्यकर्त्यांच्या विविध कार्यक्रमाला हजेरी लावत मंगळवेढा दौरे वाढले आहेत. परंतु, घटना घडून 14 दिवसाचा कालावधी गेला. प्रत्यक्ष भेट अथवा  तपासाच्या प्रगतीबाबत बद्दल माहिती घेण्यासाठी आले नाहीत. याबद्दल या समाजातील जाणकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

प्रतीकचे अपहरण केल्याची फिर्याद घेण्यास पोलिसांनी विलंब लावल्यामुळे मारेकऱ्याला त्याची कृत्य करण्यास अधिक वाव मिळाला त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणे पोलिसांना त्रास होत आहे. हे वरिष्ठांचा दबाव,नातेवाईकांची नाराजी ,आंदोलन यामुळे कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी न करता तपासात आपला वेळ वाया घालवत आहेत पो. नि. प्रभाकर मोरे यांनी हे प्रकरण नीट हाताळले नसल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्याकडील तपास डीवायएसपी दिलीप जगदाळे यांच्याकडे सोपवला. आता या प्रकरणात वेग आला आहे अतिशय शांत डोक्याने पोलिसांनी हे प्रकरण हाताळले असून आता अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा  आहे. पोलीस मारेकऱ्याला अटक केल्याचे कधी जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com