शपथविधीसाठी 'या' दाम्पत्याला मातोश्रीवरून निमंत्रण

Invitation Of Oath Program To Sawant Couple From Matoshree
Invitation Of Oath Program To Sawant Couple From Matoshree

जत ( सांगली ) - महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व आघाडीचे शासन  पाच वर्षे टिकावे, यासाठी जत तालुक्‍यातील बनाळी गावचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिवसेना नेते संजय सावंत व त्यांच्या पत्नी रूपाली सावंत यांनी ग्रामस्थांसह पंढरपूरला पायी अनवाणी चालत जाऊन विठुरायाच्या चरणी साकडे घातले होते. ते विठुरायाने सार्थ ठरवत सावंत साकडे पूर्ण केले असून सावंत यांना थेट ‘मातोश्री’ वरून खासदार विनायक राऊत यांनी फोन करून मुख्यमंत्री शपथविधीसाठी सपत्नीक निमंत्रण दिले आहे. त्यामुळे सावंत दाम्पत्य मुंबई येथे शिवतीर्थावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला रवाना झाले आहे.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खानापूर तालुक्‍याच्या  दौऱ्यावर आले होते. यावेळी ठाकरे यांची सावंत दाम्पत्याने भेट घेत  मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा व आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंढरीला पायी चालत गेल्याचे सांगितले. पक्षप्रमुख ठाकरे यांनी सावंत दाम्पत्याला शपथविधीसाठी बोलविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी सावंत यांना विनायक राऊत यांनी फोनवरून शपथविधीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले आहे.

सावंत दाम्पत्य मुंबईस रवाना

सावंत दाम्पत्य विना, तुळशी, वृंदावनसह मुंबईस रवाना झाले आहे. संजय सावंत यांनी पंढरपूरला पायी चालत जाऊन मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले होते. या पायी दिंडीमध्ये शिवसेना तालुका उपप्रमुख शिवाजी पडळकर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बंटी दुधाळ, राहुल पाटील, बी. आर. सावंत, उद्धव सावंत, सिद्राम माळी, अनिल सावंत, तुकाराम जाधव, प्रकाश सावंत, जी. एस. सावंत, गणेश कोडग, गणेश सावंत, गणेश काशीद, राजश्री माळी, लक्ष्मी माळी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com